शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट, दाद मागायची कुणाकडे ?, याआधीच्या काही प्रमुख वादाच्या घटना.. जाणून घ्या

By सचिन यादव | Updated: February 4, 2025 12:18 IST

महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या

सचिन यादवकोल्हापूर : राज्यात होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट लागत आहे. कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांवर कधी पंचांकडून अन्याय केला जातो. तर कधी आक्रमक मल्ल पंचावर हल्ला करतात. तर काही ठिकाणी मनमानी आयोजकांमुळे या स्पर्धेत वादाला तोंड फुटत आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणे दोन पैलवानांना चांगलेच महागात पडले. पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांना महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडून तीन वर्षांसाठी निलंबित केले. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडले.कुस्तीच्या आखाड्यात काही मल्लांची खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे. पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार यापूर्वी झालेल्या सामन्यात उघड झाले आहेत. अनेकदा संयोजकांवरही मल्ल धावून जातात. तर काही सामन्यात पंचाकडून मल्लांवर अन्याय केला जातो. तर काही सामन्यांवर राजकीय सावट असते. या सर्वांचा परिणाम स्पर्धेच्या निकालावर होतो.

काही प्रमुख वादातीत घटना

  • २०१७ : पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीत किरण भगतवर पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
  • २०१९ : बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत माऊली जमदाडे विरुद्ध पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
  • २०२२ : कोथरूड अधिवेशनात सिकंदर शेखवर सेमी फायनलमध्ये माती गटांत पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
  • २०२५ : अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत

दाद मागायची कुणाकडे ?क्रीडा विभागाने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. महाराष्ट्र केसरीसह देशभरात अनेक ठिकाणी कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धेत कोणावर अन्याय झाल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा काही संयोजक कोणतीही मान्यता न घेता परस्पर स्पर्धा भरवितात, अशा संयोजकांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सन २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता. ही स्पर्धा खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा दिसतो. - चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान राक्षे याने केलेला प्रकार कुस्ती क्षेत्राला भूषणावह नाही. शिवराज राक्षे याच्याकडे माफी मागण्याची संधी होती. मात्र, त्याने माफी मागितली नाही, हे दुर्दैवी आहे. कुस्ती स्पर्धेदरम्यान असे प्रकार घडू नयेत, यासाठी नियमांची कडक पुनर्बांधणी करावी. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरी

सामन्यात मैदानावरील तिन्ही पंचांनी चितपट कुस्तीचा निकाल दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवराज राक्षेने कुस्ती आखाडा प्रमुखांकडे दाद मागायला हवी होते. चितपट कुस्तीला आव्हान देता येत नाही, सामन्यातील पंचांनी योग्य भूमिका बजावली, खेळाडूंनी पंचांचा सन्मान करायला हवा. - संभाजी पाटील-कोपर्डेकर, पंच, राज्य कुस्तीगीर परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्ती