शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

महाराष्ट्र कॅरम : विकास धारिया आणि आयेशा  साजिद यांना विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 20:32 IST

अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव केला.

शिवाजी पार्क जिमखान्याने आयोजित केलेल्या बाराव्या महाराष्ट्र राज्य गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या पुरुष ऐकरी व महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारिया, दुसरी मानांकित माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिद यांनी विजेतेपद पटकाविले. 

अंतिम फेरीत मुंबईचा तिसरा मानांकित विकास धारियाने रंगतदार तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत चौथा मानांकित पुण्याच्या अभिजित त्रिफणकरचा २५-६, १३-२५, २५-४ असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाचा मानकरी ठरला व रोख रु. २५,०००/- चे बक्षिस व चषक पटकाविला. उपविजेता अभिजित त्रिफणकरला रोख रु. १२,५००/- व चषक देऊन गौरविण्यात आले. पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस्‌ व आक्रमक खेळ करत मुंबईच्या विकास धारियाने सातव्या बोर्डपर्यंत २०-६ अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चौथा मानांकित अभिजित त्रिफणकरने शांतचित्ताने   आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत सहाव्या बोर्डपर्यंत १६-११ अशी आघाडी घेत नंतरच्या बोर्डमध्ये ९ गुण मिळवून २५-११ असा दुसरा गेम जिंकून १-१ ने बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या विकास धारियाने ६ व्या बोर्डपर्यंत २०-४ गुणांनी आघाडी घेतली. नंतरच्या सातव्या बोर्डमध्ये त्याच्या ब्रेकमध्ये कटशॉटस्‌चे प्रात्यक्षिक घडवित ५ गुणांचा बोर्ड मिळवून २५-४ असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या योगश डोंगडेने तीन गेम रगंलेल्या लढतीत मुंबईच्याच माजी राज्य विजेता पंकज पवारला २५-६, ११-२५, २५-१८ अशी मात करून रुपये ८,०००/-, चषक व प्रमाणपत्र पटकाविले.

तत्पूर्वी झालेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अभिजित त्रिफणकरने सरळ दोन गेममध्ये मुंबईच्या पंकज पवारचा २५-३, २५-१२ असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने अत्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत मुंबईच्याच माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेचा २५-११, २५-८ असे दोन गेममध्ये निष्प्रभ करून अंतिम फेरी गाठली.

महिला एकेरीमध्ये दुसरी मानांकित मुंबईच्या माजी सार्क व राज्य विजेती आयेशा साजिदने सरळ दोन गेममध्ये मुंबईच्या मिताली पिंपळेचा २५-९, २५-० असा फाडशा पाडत आमचे वर्चस्व सिद्ध करून विजेतेपदावर आपले नाव कोरले व रोख रु. ८,०००/- चषक व प्रमाणपत्र याची मानकरी ठरली. उपविजेती मिताली पिंपळेला रु. ६,०००/-, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या मैत्रेयी गोगटेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ठाण्याच्या चैताली सुवारेचा २५-१६, २५-५ अशी झुंज मोडीत काढून रु. ४,०००/-, चषक व प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या आयेशा साजिदने मुबंईच्या मैत्रेयी गोगटेचे आव्हान तीन गेम रंगलेल्या लढतीत २१-२५, २५-११, २५-० अशी मात करत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मिताली पिंपळेने बिनमानांकित ठाण्याच्या चैताली सुवारेचा सरळ दोन गेम रंगलेल्या एकतर्फी लढतीत २५-३, २५-१४ असे नमवून अंतीम फेरी गाठली.

तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण १३ ब्रेक टू फिनिश आणि ५ ब्लॅक टू फिनिश नोंदविले. या स्पर्धेमध्ये एकाच वेळी ४० आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरको कॅरम बोर्डस्‌, जेरीचे स्टँड व सिसका कॅरम सोंगट्या वापरण्यात आल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र