शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मिळालेल्या प्रेमामुळे मुंबई सोडण्याची इच्छा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:17 IST

यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली

- रोहित नाईक । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाचा मोसम खूप विशेष आहे. मी मूळचा हरियाणाचा असून लीगमध्ये पहिल्यांदा हरियाणाविरुद्ध खेळेल. सुरुवातीला मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली, परंतु आजपर्यंत मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मला मुंबई सोडून जावेसे वाटत नाही. मुंबईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मी स्वत:ला मुंबईकर समजतो, असे कबड्डी स्टार आणि यू मुम्बा संघाचा कर्णधार अनुप कुमारने ‘लोकमत’शी बोलताना म्हटले.प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाला २८ जुलैपासून सुरुवात होत असून यावेळी ४ नव्या संघांचा स्पर्धेत प्रवेश झाला आहे. त्यात हरियाणाचाही समावेश आहे. याविषयी अनुपला विचारले असता तो म्हणाला की, ‘नक्कीच कर्णधार म्हणून मला हरियाणाकडून खेळण्याची इच्छा झाली. परंतु, शेवटी हा खेळ आहे आणि खेळामध्ये असे होत असते. राष्ट्रीय स्पर्धेत याआधीही मी दिल्लीचे प्रतिनिधित्व करताना हरियाणाविरुध्द खेळलो असल्याने हरियाणाविरुद्धचा सामना माझ्यासाठी इतर सामन्यांप्रमाणेच असेल.’लिलाव प्रक्रियेनंतर बदललेल्या संघाबाबत अनुप म्हणाला की, ‘संघ बदलल्यानंतर सर्वच गोष्टींमध्ये बदल होतात. आत्ताचा संघही चांगला असून प्रशिक्षकांना आमच्या विश्वास आहे. शिवाय आमच्याकडे ६-७ वरिष्ठ खेळाडू असून ते कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळू शकतात.’ त्याचप्रमाणे, ‘यावर्षी आम्ही सराव शिबिर डेहराडून येथे पार पाडले. तिथल्या वातावरणाचा आम्हाला खूप फायदा झाला. कमी आॅक्सिजनमध्ये सराव केल्याने आम्हाला तंदुरुस्तीवर अधिक लक्ष देण्यास सोपे गेले,’ असेही अनुपने म्हटले. यंदाचे सत्र तीन महिने खेळविण्यात येणार असल्याने तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना अनुपने म्हटले की, ‘तंदुरुस्ती नसेल तर कोणताच खेळाडू इतका मोठा मोसम खेळू शकणार नाही. खेळाडू तंदुरुस्त असेल तर तो दुखापतींपासून दूर राहिल. यासाठीच, अनेकांनी वैयक्तिक टे्रनरची नियुक्ती केली आहे. तंदुरुस्ती टिकवण्याचे मोठे आव्हान प्रत्येक खेळाडूपुढे असेल.’ स्पर्धेतील प्रत्येक संघ नविन असल्याने प्रत्येकापुढे आव्हान असून मुंबईचा संघ समतोल आहे. आम्ही तंदुरुस्ती टिकवण्यावर अधिक भर दिला आहे. शिवाय मुंबईची राखीव फळी नेहमीप्रमाणे मजबूत राखण्यात आम्हाला यश आले असून ही आमची जमेची बाजू आहे. - ई. भास्करण, प्रशिक्षक - यू मुम्बाआम्ही लीगसाठी सज्ज आहोत. डेहराडूनमधील सराव खूप फायदेशीर ठरला. याआधी प्रतिनिधित्त्व केलेल्या दिल्ली संघाच्या तुलनेत मुंबई संघात खूप फरक आहे. स्पर्धेत बहुतेक खेळाडू एकमेकांचा खेळ जाणून असल्याने सामने खूप चुरशीच्या होतील. युवा खेळाडूही चांगले खेळत असल्याने संघाला बळकटी आली आहे.- काशिलिंग आडके, आक्रमकसराव शिबिरात फिटनेसवर अधिक भर देण्यात आल्याने संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. कर्णधार अनुपचा खूप फायदा होतो. तो सर्वोत्तम कर्णधार आहे. प्रत्येकावर त्याचे बारीक लक्ष असते. ज्याप्रकारे तो सामन्यात शांत असतो, तसाच सरावामध्येही असतो. - नितिन मदने, आक्रमक.