शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

गुजरात लायन्सची नजर पुनरागमनावर

By admin | Updated: April 18, 2017 02:12 IST

चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गुजरात लायन्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या

राजकोट : चारपैकी तीन सामन्यांत पराभव स्वीकारल्यानंतर सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या गुजरात लायन्स संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गृहमैदानावर खेळल्या जाणाऱ्या या लढतीत लॉयन्स संघ विजयी पथावर परतण्यास उत्सुक आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा लायन्स संघ तिसऱ्या स्थानी होता, पण यावेळी मात्र हा संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. कोलकाता नाईट रायडर्स व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर लायन्सने रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध आयपीएलच्या दहाव्या पर्वात पहिला विजय नोंदवला. सुरेश रैनाच्या नेतृत्वाखालील संघाला रविवारी रात्री मुंबई इंडियन्सविरुद्ध ६ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. लायन्स संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे तर आरसीबी सर्वांत तळाला म्हणजे आठव्या स्थानी आहे. लायन्सचे आघाडीचे फलंदाज ब्रॅन्डन मॅक्युलम, अ‍ॅरोन फिंच, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्मात आहेत, पण त्यांना सांघिक कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन स्मिथला मुंबईविरुद्ध मोठी खेळी करता आली नाही, पण सलामीवीर म्हणून मॅक्युलमच्या साथीने तो महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. क्रिकेट किट हरविल्यामुळे फिंच मुंबईविरुद्ध खेळू शकला नाही. लायन्स संघासाठी पहिल्या दोन लढतींमध्ये गोलंदाजी चिंतेची बाब ठरली होती, पण अ‍ॅन्ड्य्रू टायच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. टायने पुण्याविरुद्ध पाच बळी घेत चमकदार कामगिरी केली होती. त्यात हॅट््ट्रिकचाही समावेश होता. त्याने रविवारी मुंबईविरुद्धच्या लढतीतही दोन बळी घेतले. प्रवीण कुमार पहिल्या दोन षटकांत चांगली कामगिरी करीत होता. पुणे व मुंबई यांच्याविरुद्धच्या लढतीत त्याने लायन्स संघाला सुरुवातीला यशही मिळवून दिले, पण डेथ ओव्हर्समध्ये तो महागडा ठरला आहे. मुनाफने रविवारी पहिली लढत खेळताना एक बळी घेतला तर केरळच्या बासिल थम्पीने मुंबईविरुद्ध प्रभावी मारा केला. जडेजाच्या पुनरागमनानंतरही फिरकीची बाजू कमकुवत भासत आहे. जकाती व कौशिक महागडे ठरले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या उपविजेत्या आरसीबी संघाची कामगिरीही निराशाजनक आहे. त्यांनी चार सामने गमावले असून केवळ एक विजय मिळवला आहे. कोहलीला दुखापतीमुळे पहिल्या दोन लढतींमध्ये खेळता आले नव्हते. त्याने पंजाबविरुद्ध ६२ धावांची खेळी केली होती, पण अन्य स्टार फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.आरसीबीविरुद्ध लढत आजप्रतिस्पर्धी संघ गुजरात लायन्स :- सुरेश रैना (कर्णधार) ,अक्षदीप नाथ, शुभम अग्रवाल, बासिल थम्पी, ड्वेन ब्राव्हो, चिराग सुरी, जेम्स फॉकनर, अ‍ॅरोन फिंच, मनप्रीत गोनी, ईशान किशन, रवींद्र्र जडेजा, शादाब जकाती, दिनेश कार्तिक, धवल कुलकर्णी, शिविल कौशिक, प्रवीण कुमार, ब्रँडन मॅकुलम, मुनाफ पटेल, प्रथम सिंग, जेसन राय, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, शैली शौर्या, नत्थुसिंग, ड्वेन स्मिथ, तेजस बारोका, अ‍ॅन्ड्य्रू टाय.रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), टाइमल मिल्स, अनिकेत चौधरी, प्रवीण दुबे, बिली स्टानलेक, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, यजुवेंद्र चहल, हर्षल पटेल, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिल्ने, सरफराज खान, श्रीनाथ अराविंद, केदार जाधव, शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, सैमुअल बद्री, इक्बाल अब्दुल्ला, ट्रेविस हेड, सचिन बेबी, अवेश खान आणि तबरेज शम्सी.