शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआय नेमणार लोकपाल

By admin | Updated: October 24, 2015 04:24 IST

बीसीसीआयचे कामकाज अधिक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्याच्या हेतूने आगामी ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत लोकपाल नियुक्त करण्यात येणार आहे.

मुंबई : बीसीसीआयचे कामकाज अधिक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करण्याच्या हेतूने आगामी ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आमसभेत लोकपाल नियुक्त करण्यात येणार आहे. बोर्डाचे दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेले शशांक मनोहर यांनी ही घोषणा केली होती. त्यानुसार पावले उचलण्यात येत आहेत.नैतिक अधिकारी अर्थात लोकपालाची नियुक्ती बोर्डाच्या ‘मेमोरेंडम आॅफ रुल्स अ‍ॅन्ड रेग्यूलेशन्स’मधील बदलाचा भाग असेल. या नियमानुसार प्रशासकांद्वारे जोपासण्यात येणारे हितसंबंध, नियम व अटींचा भंग यावर लोकपालाची नजर असेल. नियमानुसार राष्ट्रीय निवड समितीने निवडलेल्या प्रत्येक संघाला बोर्डाच्या अध्यक्षाची परवानगी अनिवार्य राहील. याच नियमामुळे भारताने २०१२मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ०-४ ने गमविताच राष्ट्रीय निवड समिती प्रमुख के. श्रीकांत यांनी महेंद्रसिंह धोनीची वन डे कर्णधारपदावरून उचलबांगडी केली होती. मात्र तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी स्वत:चा व्हेटो वापरून धोनीला कर्णधारपदी कायम ठेवले होते. सध्याच्या नियमानुसार समितीने निवडलेल्या संघाला बोर्ड अध्यक्षांची परवानगी आवश्यक आहे. प्रस्तावित बदलानंतरअध्यक्ष हे अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वेळोवेळी राष्ट्रीय निवड समितीने निवडलेल्या संघाला स्वीकृती प्रदान करतील. (वृत्तसंस्था)प्रस्तावित बदल :अध्यक्षाकडे व्हेटो ऐवजी निर्णायक मत असेल आणि केवळ गरज असेलतेव्हाच त्या मताचा उपयोग करता येईल.बोर्डात कुठल्याही क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बोर्डाच्या किमान दोन आमसभेला उपस्थित राहणे अनिवार्य. त्यानंतरच बोर्डाच्या उपाध्यक्षपदासाठी त्या व्यक्तीला निवडणूक लढविता येईल.आॅडिट अहवाल तसेच स्वतंत्र अंकेक्षकाचा अहवाल आल्यानंतरच बीसीसीआय सदस्यांना आर्थिक रक्कम देईल. विविध स्पर्धा आटोपल्यानंतर सदस्यांनी ३० दिवसांच्या आत बीसीसीआयकडे तपशील सादर करणे अनिवार्य राहील.उपसमितीची सदस्यसंख्या आठपर्यंत मर्यादित ठेवली जाईल. सध्या राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीत १२ सदस्य आहेत. चेतन देसाई यांच्या नेतृत्वाखालील मार्केटिंग आणि संग्रहालय समितीत क्रमश : २९ आणि १३ सदस्यांचा समावेश आहे. आयपीएलच्या पाच सदस्यीय संचालन परिषदेची नियुक्ती आमसभा करेल. परिषदेचा कार्यकाळ आगामी एजीएमपर्यंत असावा. आयपीएलचे निर्णय बहुमताने व्हावेत. मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाने निर्णायक मत द्यावे. आयपीएलसाठी संचालन परिषदेने वेगळे बँक खाते उघडावे. बीसीसीआय कोषाध्यक्ष हे खाते सांभाळतील.राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बोर्डाचे अध्यक्ष, प्रत्येक क्षेत्राचा एक सदस्य व दोन सेवानिवृत्त क्रिेकटपटू असावेत.