शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

लोकमत एनपीएल क्रिकेट -२

By admin | Updated: January 23, 2016 00:09 IST

मराठा वॉरियर्सचा ५४ धावांनी विजय

मराठा वॉरियर्सचा ५४ धावांनी विजयलोकमत एनपीएल क्रिकेट : पहिले शतक झळकविणारा दिनेश शिंदे सामनावीरनाशिक : राजुरी स्टील प्रस्तूत लोकमत एनपीएल क्रिकेट महोत्सवातील दहाव्या सामन्यात दिनेश शिंदे या अष्टपैलू खेळाडूने शतक झळकवून मराठा वॉरियर्सला शानदार विजय मिळवून दिला. २० षटकांत ६ बाद १७२ धावा करणार्‍या मराठाने ५४ धावांनी संदीप फाल्कन्स संघाला हरविले. संदीप फाल्कन्स हा संघ २० षटकांत ८ गडी बाद केवळ ११८ धावा करू शकला. संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करणार्‍या मराठा वॉरियर्सचा दिनेश शिंदे याने ५८ चेंडूत ७ षटकार व ६ चौकार मारून नाबाद शतक ठोकले. त्याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याला संघातील अक्षय सोनार याने २५ धावा, कपिल शिरसाठ याने २३, तर हर्षद मेर याने ११ धावा देऊन संघाची धावसंख्या वाढविण्यास मदत केली. संदीप फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना वीराज ठाकूर व श्रीकांत शेरीकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर लाभेश सोनवणे याने एक गडी बाद केला. गौरव काळे याने तीन षटकांत ३१, तर मनोज परमार याने चार षटकांत ३६ धावा दिल्या. संदीप फाल्कन्सतर्फे फलंदाजी करताना सुनील यादव याने ८ चेंडूत एक षटकार व दोन चौकार मारत १५ धावा केल्या, तर सौरभ देवरे याने १४ चेंडूत १४ धावा केल्या. विराज ठाकूर याने २९ चेंडूत ३२ धावा करताना चार चौकार मारले. केतन कस्तुरे याने ११ चेंडूत २१ धावा करताना दोन षटकार व एक चौकार मारला. मराठा वॉरियर्सतर्फे गोलंदाजी करताना मोहन केसी याने चार षटकांत ३३ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर उदय बोडके, कुणाल कोठावदे, अनिल लहामगे व दिनेश शिंदे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. फोटो क्रमांक: २२पीएचजेए ९६....उदय बोडकेच्या चेंडूवर मनोज परमारचा उडालेला त्रिफळा. फोटो क्रमांक : २२पीएचजेए ९८....मराठा वॉरियर्स विरुद्ध संदीप फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यातील एक चित्तथरारक क्षण. फोटो क्रमांक: २२पीएचजेए ९१....मराठा वॉरियर्स विरुद्ध संदीप फाल्कन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी नाणेफेकप्रसंगी उपस्थित प्रा. गौरव सोनवणे, सौरभ हरी सोनकांबळे, माया जगताप, कर्णधार मनोज परदेशी, हरी सोनकांबळे, प्रभाकर दाते, गोपाळ पाटील, राजेंद्र निकम, कर्णधार योगेश महाले, आनंद खरे, सुरेश लासुरे, अविनाश गोठी व नंदलाल धांडे.