शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

लोकेश राहुल कारकिर्दीत सर्वोत्तम स्थानी

By admin | Updated: March 31, 2017 00:55 IST

आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा

दुबई : आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे चौथ्या कसोटीत दोन अर्धशतके झळकविणारा सलामीवीर लोकेश राहुल हा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट ११ व्या स्थानावर विराजमान झाला. कर्नाटकच्या २४ वर्षांच्या राहुलचे मालिकेआधी क्रमवारीत ५७ वे स्थान होते. त्याने चार सामन्यात ६४, १०,९०, ५१,६७, ६० आणि नाबाद ५१ अशा धावा काढून थेट ४६ स्थानांची जबरदस्त झेप घेतली. यासह तो चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यानंतरचा सवोत्तम क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला.दुसरीकडे, चेतेश्वर पुजारा चौथ्या आणि विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. पुजारा आणि कोहली यांची अनुक्रमे दोन व एका स्थानाने घसरण झाली आहे. चौथ्या कसोटीत भारताचे नेतृत्व केलेल्या अजिंक्य रहाणेने तीन स्थानांनी प्रगती करताना १४वे स्थान पटकावले असून मुरली विजय मात्र चार स्थानांनी ३४ व्या स्थानावर घसरला आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजांध्ये पहिल्या तर न्यूझीलंडचा केन विलियम्सन दुसऱ्या स्थानावर आहे.गोलंदाजीत रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विन या फिरकी जोडीने पहिले दोन स्थान कायम राखले आहे. तसेच, आॅस्टे्रलियाविरुद्ध तुफानी मारा केलेला उमेश यादव करियरमधील सर्वोच्च २१ व्या स्थानी पोहोचला आहे. उमेशने चौथ्या कसोटीत पाच गडी बाद केले होते. अष्टपैलूंमध्ये जडेजा चमकला असून त्याने अश्विनकडून दुसरे स्थान हिसकावले. बांगलादेशचा शकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. जडेजाने धरमशाला येथे चार गडी बाद करुन ६३ धावांचे योगदान दिले. त्याला मालिकावीराचा सन्मान मिळाला. (वृत्तसंस्था)आॅस्टे्रलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात अर्धशतक झळकावताना मालिकेत एकूण ३९३ धावा काढल्या. त्याने या मालिकेत तब्बल ६ अर्धशतक झळकावताना सलामीवीर म्हणून स्वत:चे स्थान भक्कम केले. रविंद्र जडेजाने संपुर्ण मालिकेत निर्णायक अष्टपैलू कामगिरी करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने चार सामन्यांत २५ बळी घेताना फलंदाजीतही चमक दाखवताना १२७ धावा काढल्या. त्यात, अखेरच्या कसोटीमध्ये पहिल्या डावात त्याने संघ अडचणीत असताना केलेली ६३ धावांची निर्णायक ठरली.या अर्धशतकाच्या जोरावर आघाडी घेतल्यानंतर भारताने कांगारुंना लोळवले. विशेष म्हणजे, हुकमी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यानंतरही जडेजाने आपल्या धडाक्यापुढे आश्विनच्या वर्चस्वाची कमतरता भासू दिली नाही.