शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीविरुद्ध मदत मागितली नव्हती!

By admin | Updated: October 18, 2016 04:22 IST

लोढा समितीच्या शिफारशी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मदत मागितली नव्हती.

नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मदत मागितली नव्हती. आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांना भाष्य करण्यास आपण सांगितले नव्हते, असे प्रतिज्ञापत्र बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात सादर केले. कोर्टाने यावर निर्णय राखून ठेवला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या स्वरूपाची विनंती ठाकूर यांनी आपल्याला केली होती, असा दावा केला होता. त्यावर कोर्टाने ठाकूर यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रतिज्ञापत्रात ते म्हणाले, ‘लोढा समितीची नियुक्ती बीसीसीआयच्या कामकाजात शासकीय दखल असल्याचे वक्तव्य रिचर्डसन यांना करण्यास मी सांगितले होते का, अशी विचारणा करण्यात आली होती. रिचर्डसन यांना अशी विनंती केल्याचा मी इन्कार करतो. अलीकडे मी आयसीसी बैठकीत भाग घेतला होता. या बैठकीत आयसीसी अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी प्रमुख शशांक मनोहर यांनी, ‘‘सीएजी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची लोढा समितीची शिफारस ही बीसीसीआयच्या कामकाजात शासकीय ढवळाढवळ करण्यासारखी असेल. अशा वेळी आयसीसी बोर्डाला निलंबित करू शकते,’ असे मत व्यक्त केले होते. यावर मी मनोहरांना विनंती केली, की आपण बीसीसीआय अध्यक्ष असताना जी भूमिका घेतली ती आयसीसी अध्यक्ष या नात्याने पत्राद्वारे कळवू शकता काय! यावर मनोहर म्हणाले, ‘‘मी ही भूमिका घेतली त्या वेळी प्रकरण न्यायालयात होते व अद्याप निकाल यायचा आहे.’’ बीसीसीआयचा शासकीय हस्तक्षेपाचा युक्तिवाद कोर्टाने नंतर फेटाळून लावला होता, याचे स्मरण ठाकूर यांनी प्रतिज्ञापत्रात करून दिले. कोर्टाने त्या वेळी व्यक्त केलेला शेरा प्रतिज्ञापत्रात असून कोर्टाने बीसीसीआयच्या आर्थिक प्रकरणात पारदर्शीपणा आल्याचे पाहून आयसीसीला बरे वाटेल, असे त्या वेळी म्हटले होते.रत्नाकर शेट्टी यांनी लोढा शिफारशींविरु द्ध प्रतिज्ञापत्र का सादर केले? मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनाच हा अधिकार असतानाही शेट्टी यांनी हे पाऊल का उचलले, याचे उत्तर शेट्टी यांना द्यायचे होते. (वृत्तसंस्था)>बीसीसीआयला हवा आणखी अवधीलोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास बीसीसीआयने सुप्रीम कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना हटवून प्रशासकांचे पॅनल बसविण्याची शिफारस लोढा समितीने केली होती. बोर्डाने शिफारशी न मानल्यास पदाधिकाऱ्यांना हटविणे अखेरचा उपाय राहील, असे कोर्टाने सोमवारी सुनावणीदरम्यान म्हटले. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठाने बीसीसीआयचे वकील कपिल सिब्बल आणि न्यायालय मित्र गोपाल सुब्रमण्यम यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या समितीने सुचविलेल्या शिफारशी अमलात आणण्यास टाळाटाळ करणाऱ्या बोर्डाची खंडपीठाने आज चांगलीच कानउघाडणी केली. बोर्डाने दोन दिवसांआधी झालेल्या विशेष सभेत लोढा यांच्या सर्व शिफारशी मानणे शक्य नसल्याचे सांगून आक्रमक पवित्रा घेतला होता.शिफारशी अमलात आणण्यासाठी संलग्न राज्य संघटनांचे मन वळविण्यासाठी बोर्डाला वेळ हवा, अशी विनंती बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयाला केली. काही शिफारशी आधीच लागू केल्या असून अन्य शिफारशी अमलात आणण्यास कालमर्यादा हवी. काही राज्य संघ अद्यापही शिफारशी लागू करण्यास तयार नसल्याने लोढा समितीच्या शिफारशींचे तंतोतंत पालन होण्यास वेळ होत असल्याचे हे मोठे कारण आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. >ठाकूर व शेट्टी यांना फटकारले...सर्वोच्च न्यायालयाने लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत टाळाटाळ करीत असलेल्या बीसीसीआय बॅकफूटवर टाकताना सांगितले, की विद्यमान अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि वरिष्ठ अधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोठा विरोधाभास आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले, ‘‘ठाकूर यांनी स्वीकार केले, की त्यांनी आयसीसी चेअरमनला पत्र लिहिण्यास सांगितले होते, तर शेट्टी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार असे काहीही झाले नव्हते.’’