शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

लोकल बातम्या

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

पांडे ले-आऊट येथे टेटे प्रशिक्षण शिबिर

पांडे ले-आऊट येथे टेटे प्रशिक्षण शिबिर
नागपूर : खामलाप्लॉट होल्डर्स को- ऑप हाऊसिंग सोसायटी द्वारा पांडे ले-आऊट येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी टेबल टेनिस प्रशिक्षण वर्ग सुरू होतआहेत . पांडे ले-आऊट सभागृहात हे वर्ग सायंकालीन सत्रात घेण्यात येतील. राजू मोपकर तसेच डॉ. अशोक कळंबे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण चालणार असून इच्छुकांनी संपर्क करावा, असे संस्थेचे अध्यक्ष ईश्वर आष्टनकर यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
.........................................
जिल्हा सब ज्युनियर ॲथ्लेटिक्स संघ जाहीर
प्रज्वल, वृशाली यांच्याकडे नेतृत्व
नागपूर : प्रज्वल सबळ आणि वृशाली घारड हे रविवारी पुण्यात आयोजित राज्य सब ज्युनियर ॲथ्लेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नागपूर जिल्हा संघाचे मुले तसेच मुलींच्या संघाचे नेतृत्व करतील. बाबूराव सणस मैदानावर स्पर्धा होणार आहेत. १४ वर्षे गटाच्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडण्यात येईल. जितेंद्र घोरदडेकर हे संघ प्रशिक्षक आहेत. व्यवस्थापकपदाची जबाबदारी रामचंद्र वाणी तसेच सहायक व्यवस्थापकाची जबाबदारी अश्विनी भोयर यांच्याकडे असेल.
संघ मुले : प्रज्वल सबळ, जयंत वरंभे , सौरव दुबे, तेजस वधुधे, चंद्रशेखर ठाकरे, प्रथमेश मुंडले, करण वासाडे. मुली : वृशाली घारड, अवंती हटवार , मानसी पी., साक्षी रहाटे , तन्नु लिल्हारे.
....................................................
जिगेश, शार्विका, आर्यन, सोहम यांची विजयी सलामी
जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सुरू
नागपूर : जिगेश इसरानी, शार्विका मोकदम, आर्यन मांडवगणे आणि सोहम के.यांनी शानदार विजयासह आजपासून येथील सुभेदार सभागृहात सुरू झालेल्या जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत शुक्रवारी दहा वर्षे गटात विजयी सलामी दिली.
मुलांमध्ये सोहमने अद्वैत अडिकणे याच्यावर ३०-२४ अशा फरकाने विजय नोंदविला. मांडवगणे याने आर्यन साधकरचा ३०-२६ ने पराभव केला तर श्लोक आणि जीव पिल्ले यांच्यातील लढत अतिशय रोमहर्षक ठरली. श्लोकने जीवविरुद्ध ३०-२४ ने विजय नोंदविला. अन्य लढती मात्र एकतर्फी झाल्या.
मुलींमध्ये शार्विका मोकदमने वैष्णवी शर्माचा ३०-२९ असा निसटता पराभव केला. जिगेश इसरानीने आदिती धामणकर ला ३०-२४ अशा फरकाने नमविले.
निकाल १० वर्षे मुले पहिली फेरी : ओजस गेडाम मात बुद्धघोष वासनिक ३०-१०, जिगर देशमुख मात अद्वैत मिस्त्री ३०-१४, चैतन्य चौधरी मात श्रीहरी करंदीकर ३०-११, रिशांक चुटके मात रंजन रामानी ३०-२१, ओम अग्रवाल मात देवांग दमकोंडावार ३०-१८, सोहम के. मात अद्वैत अडिकणे ३०-२४, अभिषेक कानिटकर मात कार्तिक तिवरखेडे ३०-८.