लंडन : बार्सिलोना एफसीचा सुपरस्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर विवाहबंधनात अडकला आहे. मेस्सी आपली बालमैत्रीण अँटोनेला रिकुज्जोसोबत विवाहबद्ध झाला आहे. या लग्नाची गेले काही दिवसांपासून क्रीडाविश्वात मोठी चर्चा होती. हे लग्न म्हणजे वेडिंग आॅफ द सेंच्युरी म्हणलं जात होतं. या लग्नसोहळ्यासाठी क्रीडा आणि सिनेमा जगतातील तारे एकत्र आले होते. अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी एकूण २५० पाहुणे आमंत्रित होते. पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक यांचाही पाहुण्यांच्या यादीत समावेश होता. दोघे कदाचित लग्नाला येणार नाहीत असं वृत्त याआधी मिळत होतं; मात्र दोघांनीही लग्नाला हजेरी लावली. लग्नासाठी क्रीडाविश्वातील अनेक स्टार खेळाडूही आवर्जून उपस्थित होते. (वृत्तसंस्था)या लग्नासाठी मोठी सुरक्षा पुरविण्यात आली होती. ४०० पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. अँटोनेला रिकुज्जोने रोसा क्लाराने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. पाहुण्यांसाठी कॉम्प्लेक्समधील पुलमन हॉटेलमध्ये १८८ रूम बुक करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर पाहुण्यांनी गजबजला असल्याने सामान्यांसाठी रहदारी बंद करण्यात आली होती.
लिओनेल मेस्सीचा ‘शूटआऊट’ बालमैत्रिणीसोबत अडकला विवाहबंधनात
By admin | Updated: July 2, 2017 00:17 IST