शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

मजूर आई-बापाच्या प्रवीणचा संघर्ष प्रेरणादायी, PM मोदींकडून मराठमोळ्या एथलेटचं कौुतक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 05:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव; ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना शुभेच्छा

ठळक मुद्देदेशाची महिला हॉकी संघातील खेळाडू नेहा गोयल हिची आई व बहिणी सायकलच्या कारखान्यात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. उत्कृष्ट तिरंदाज असलेल्या दीपिकाकुमारीच्या आयुष्यातही अनेक चढउतार आले.

नवी दिल्ली : भारताचा उत्कृष्ट तिरंदाज प्रवीण जाधव यांनी बिकट स्थितीवर मात करून क्रीडाकौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या एका गावाचा रहिवासी असलेल्या प्रवीण याचे आईवडील मजुरी करून घर चालवितात. कष्टकऱ्याचा मुलगा भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे, ही केवळ प्रवीण जाधव यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक  देशवासीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.  नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमात सांगितले की, ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी अनेकांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

देशाची महिला हॉकी संघातील खेळाडू नेहा गोयल हिची आई व बहिणी सायकलच्या कारखान्यात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. उत्कृष्ट तिरंदाज असलेल्या दीपिकाकुमारीच्या आयुष्यातही अनेक चढउतार आले. दीपिकाचे वडील रिक्षा चालवितात व आई नर्स आहे. भारतातर्फे ऑलिम्पिकला जाणारी ती एकमेव महिला तिरंदाज आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील रहिवासी प्रियंका गोस्वामीचे वडील बसकंडक्टर आहेत. पदक मिळणाऱ्या खेळाडूला जी बॅग मिळते, ती लहानपणापासून प्रियंकाला खूप आवडायची. त्या आकर्षणापायी प्रियंकाने रेस वॉकिंगमध्ये भाग घेतला. आज ती या प्रकारातील चॅम्पियन आहे. भालाफेक या क्रीडाप्रकारातील खेळाडू शिवपाल सिंह बनारसचे रहिवासी असून त्यांचे सारे कुटुंबच खेळाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, काका, भाऊ हे सारेजण भालाफेकीत निपुण आहेत. शटल स्पर्धेतील भारतीय खेळाडू चिराग शेट्टी व सात्विक साईराज यांचीही ऑलिम्पिकमधील मेन्स डबल शटल स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. चिराग यांच्या आजोबांचे कोरोनाने नुकतेच निधन झाले. सात्विक गेल्या वर्षी कोरोनाने आजारी होते.

१४० कोटी लोकसंख्येच्या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उल्लेख करणे हा खूप मोठा सन्मान आहे. ‘मन की बात’मध्ये त्यांनी केलेला माझा उल्लेख टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाचे लक्ष्य साधण्यासाठी निश्चित प्रेरणा देणारा आहे,’ -प्रवीण रमेश जाधव 

मिल्खासिंग यांना वाहिली आदरांजलीभारताचे विख्यात अ‍ॅथलिट मिल्खासिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, मिल्खासिंग यांचे कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ते रुग्णालयात उपचार घेत असताना संपर्क साधून मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.  २०१४ साली सुरतमध्ये नाइट मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी मिल्खासिंग आले असताना, त्यांच्याशी खेळांबद्दल चर्चा झाली होती. 

तलवारपटू भवानीदेवीचेही केले कौतुकपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चेन्नई येथे राहणाऱ्या व तलवारबाजीत प्रवीण असलेल्या सी.ए. भवानीदेवी हिच्या प्रशिक्षणासाठी पैसा उभा करण्याकरिता तिच्या आईने स्वत:चे दागिने गहाण ठेवले.   हरयाणातील भिवानी येथील मनीष कौशिक हा बॉक्सिंग खेळाडू शेतकऱ्याचा मुलगा आहे. लहानपणी शेतात काम करताकरता त्याने बॉक्सिंगची आवडही जोपासली, असेही मोदी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Narendra Modiनरेंद्र मोदी