शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

कर्णधारांनी नेतृत्व कौशल्याने छाप सोडली

By admin | Updated: May 19, 2017 02:49 IST

यंदाच्या आयपीएलच्या पर्वात संघाच्या कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य दखल घेण्यासारखे आहे. कर्णधारांचा त्यांच्या संघावरील प्रभाव प्रशंसेस पात्र आहे. अचूक चाल रचून

- सुनील गावसकर लिहितात...यंदाच्या आयपीएलच्या पर्वात संघाच्या कर्णधारांचे नेतृत्व कौशल्य दखल घेण्यासारखे आहे. कर्णधारांचा त्यांच्या संघावरील प्रभाव प्रशंसेस पात्र आहे. अचूक चाल रचून किंवा स्वत: उल्लेखनीय योगदान देत संघसहकाऱ्यांपुढे ते उदाहरण सादर करीत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये खेळ वेगाने बदलत असल्यामुळे कर्णधाराला विशेष काही करता येत नसल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या मोसमात मात्र चणाक्ष नेतृत्वामुळे कर्णधार सामना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्णधार कधी गोलंदाजीमध्ये बदल करीत किंवा क्षेत्ररक्षणात बदल करीत किंवा फलंदाजी क्रमामध्ये बदल करीत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने वळविण्यात यशस्वी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने तीन फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्यानंतर, संघ अडचणीत असताना शानदार फलंदाजी करीत संघाला चमकदार विजय मिळवून दिला. त्याआधी, त्याने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत फॉर्मातील आक्रमक फलंदाजांचा समावेश असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला केवळ १२८ धावांत रोखण्याची कामगिरी केली. डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल दोन स्थानावर आहेत; पण गंभीरने गोलंदाजीमध्ये अचूक बदल करीत त्यांच्यासह सनरायझर्सच्या अन्य फलंदाजांना जम बसविण्याची संधी दिली नाही. स्टीव्ह स्मिथनेही शानदार नेतृत्व करीत पुणे संघाला अंतिम फेरी गाठून दिली. त्याला महेंद्रसिंह धोनीची योग्य साथ लाभली हे वेगळे सांगायला नको. यष्टिरक्षणाची भूमिका बजावताना धोनी क्षेत्ररक्षकांना योग्य जागेवर तैनात राहण्याचा सल्ला देत होता. डेव्हिड वॉर्नरची कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार व उपकर्णधार खेळाबाबत अचूक विचार करीत आहेत, ही आॅस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चांगली बाब आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना फलंदाजांची कामगिरी उंचावेल, अशी मुंबई इंडियन्स संघाला आशा आहे. रोहित शर्माला चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आले असले, तरी फलंदाजी क्रमामध्ये केलेला बदल मुंबई संघासाठी लाभदायक ठरला नाही. बाद फेरीच्या लढतींमध्ये अशा प्रकारच्या निर्णयामुळे सामन्याचे चित्र बदलू शकते आणि मुंबई संघाबाबत तेच घडले. मुंबई संघाला डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. डावाच्या अखेरच्या टप्प्यात सामना मुंबई संघापासून दूर गेला. बुमराहने अखेरचे दोन चेंडू अप्रतिम यॉर्कर टाकले, पण त्यापूर्वी त्याच्या त्या षटकात दोन षटकार लगावल्या गेले होते. यंदाच्या मोसमात साखळी फेरीमध्ये मुंबईने दोन्ही लढतींमध्ये कोलकाता संघाचा पराभव केला आहे, पण कोलकाता संघाने त्यानंतर चमकदार कामगिरी करीत आगेकूच केली आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान शुक्रवारी खेळल्या जाणारी लढत चुरशीची होईल. (पीएमजी)