शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

अखेरचे दोन बळी जॉन्सनच्या नावे

By admin | Updated: November 18, 2015 03:59 IST

आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी वाका मैदानावर अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरचे दोन बळी घेत आंतरराष्ट्रीय

पर्थ : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्ध मंगळवारी वाका मैदानावर अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरचे दोन बळी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. यजमान संघाने उपाहारानंतर ७ बाद ३८५ धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. न्यूझीलंडपुढे मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी ४८ षटकांत ३२१ धावा फटकावण्याचे लक्ष्य होते. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ तासाभराचा खेळ वाया गेला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेले न्यूझीलंडचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले नाही. न्यूझीलंडने २ बाद १०४ धावांची मजल मारली असता सामना अनिर्णीत संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्या वेळी रॉस टेलर (३६) आणि केन विल्यम्सन (३२) खेळपट्टीवर होते. आॅस्ट्रेलियाने गॅबा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २०८ धावांनी विजय मिळविला होता. या विजयाच्या जोरावर आॅस्ट्रेलिया संघ चॅपेल-हॅडली चषक आपल्याकडे कायम राखणार असल्याचे निश्चित झाले होते. दिवसाच्या सुरुवातीलाच आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या जॉन्सनने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत परतवत स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. जॉन्सनने टॉम लॅथमला (१५) हेजलवूडकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मार्टिन गुप्टील (१७) याला माघारी परतवले. त्याआधी, जॉन्सन ज्या वेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्या वेळी न्यूझीलंडच्या संघाने गार्ड आॅफ आॅनर दिला. पहिल्या डावात १५७ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेणाऱ्या जॉन्सनने त्या तुलनेत दुसऱ्या डावात चांगला मारा केला. त्याने ६ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याआधी, सकाळच्या सत्रात आॅस्ट्रेलियाची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही शतकवीर फलंदाज कर्णधार स्टिव्हन स्मिथ आणि अ‍ॅडम व्होग्स झटपट माघारी परतले. स्थिमने १३८ धावा केल्या. त्याला ट्रेन्ट बोल्टने (२-७७) माघारी परतवले. डग ब्रेसवेलने त्यानंतर मिशेल मार्शला (०१) पायचित केले. व्होग्स (११९) टीम साऊदीचे (४-९७) लक्ष्य ठरला. आॅस्ट्रेलियाने सकाळच्या सत्रात २४ धावांत ३ फलंदाजांना गमावले. पीटर नेव्हील (३५) आणि जॉन्सन (२९) यांनी आक्रमक ६१ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाला डाव घोषित करण्याची संधी प्रदान केली. जॉन्सन फलंदाजीसाठी आला त्या वेळी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याला गार्ड आॅफ आॅनर दिला. तो खेळपट्टीवर आल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने त्याच्यासोबत हस्तांदोलन केले. जॉन्सनला साऊदीने माघारी परतवले. (वृत्तसंस्था)