ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पुढच्या वर्षी २०१६ मध्ये होणा-या आयसीसी टी-२० वर्ल्डकप क्रिकेटचे सामने भारतात होणार असून या अंतिम सामने कोलकात्यातील ईडन गार्डनवर ठेवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने आज सांगितले.
आयसीसी वर्ल्डकप टी-२० क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन ११ मार्च ते ३ एप्रिल २०१६ या दरम्यान करण्यात आले असून हे सामने आठ शहरामध्ये ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, बंगळुरु, चेन्नई, धरमशाळा, मोहाली, नवी दिल्ली आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. तर, कोलकातामध्ये अंतिम सामने खेऴविण्यात येणार असल्याचे यावेळी बीसीसीआयने सांगितले.