शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

मराठी पताका फडकविण्यासाठी ‘रिओ’त धावणार ललिता बाबर

By admin | Updated: July 29, 2016 03:18 IST

रिओ आॅलिम्पिकसाठी २८ भारतीयांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी यात मराठी नावे दोनच आहेत. ललिता बाबर आणि कविता राऊत-तुंगार. या दोन रणरागिणींनी रिओच्या

- विश्वास चरणकर, कोल्हापूररिओ आॅलिम्पिकसाठी २८ भारतीयांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये पात्रता मिळवली असली तरी यात मराठी नावे दोनच आहेत. ललिता बाबर आणि कविता राऊत-तुंगार. या दोन रणरागिणींनी रिओच्या दरवाजावर धडक मारली आहे. त्यापैकी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर ठरलेली ललिता ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे.‘माणदेशी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललिता शिवाजी बाबरचा जन्म सातारा जिल्ह्यातील मोही (ता. माण) या छोट्याशा गावात झाला. दुष्काळाचं रणरणतं लेणं कपाळावर गोंदलेल्या या गावात ललिताचं बालपण काट्याकुट्यातून पळण्यात गेलं, पण हीच काट्याकुट्याची वाट तिला ‘रिओ’च्या ट्रॅकवर घेऊन गेली. २00५ साली पुण्यात झालेल्या २0 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्र्धेत तिने पहिले सुवर्णपदक जिंकले. २0१४ मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये हॅट्ट्रिक नोंदविल्यानंतर ललिताने आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्यादृष्टीने ३000 मीटर स्टीपलचेस प्रकारात करिअर करायचा निर्णय घेतला. या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स खेळाडूने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन आतापर्यंत २३ पदके मिळविली आहेत. त्यामध्ये ८ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश आहे. तिने चीनमधील वुहानमध्ये झालेल्या २१ व्या अ‍ॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ९.३४.१३ वेळ नोंदवून आशियाई व राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळविले होते. २०१४ मध्ये १७ वी आशियाई क्रीडा स्पर्धा इंचिओन (दक्षिण कोरिया) येथे झाली. त्या स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये कांस्यपदक मिळविले होते. यावेळी तिने ९.३५.३७ अशी वेळ नोंदवली. या स्पर्धेत तिने सुधा सिंगचा विक्रम मोडला होता, पण या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती बहारीनची रुथ जेबेट ही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने ललिताचे कांस्य रौप्यपदकात बदलले. व्हिएतनाममधील २००९ च्या आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेत व २०१० च्या दिल्ली येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. २०१२ पासून मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती विजेतेपद मिळवित आहे. जानेवारी २०१५ मधील या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. याशिवाय भारतीय आॅलिम्पिक असोसिएशन आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने २०११ मध्ये ३ हजार मीटर धावताना कांस्यपदक मिळविले. २0१५मध्ये बीजिंग येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ललिताने ९.२७.८६ अशी वेळ नोंदवून आॅलिम्पिक पात्रता मिळवली. या शर्यतीत ती अंतिम फेरीत आठवी आली असली तरी अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या स्पर्धेत नोंदवलेली वेळ तिने दिल्ली येथे एप्रिल २0१६ मध्ये झालेल्या फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मागे टाकून ९.२७.0९ अशी नवी वेळ नोंदवली. आता तिचे लक्ष्य आहे ते आॅलिम्पिक पदकाचे. हे स्वप्न पूर्ण करून ती रिओ आॅलिम्पिकमध्ये मराठी पताका फडकावेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही !लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर- २0१६ चा ‘महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर’ (क्रीडा विभाग) पुरस्कार देऊन लोकमत समूहाने ललिताच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.- २0१५ ला ललिताला ‘स्पोर्टस् पर्सन आॅफ द इयर’ पुरस्कार देण्यात आला.- फिक्की आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा ‘इंडिया स्पोर्टस् अ‍ॅवार्ड’ (२0१५)ललिताचे माईलस्टोन वर्षस्पर्धा स्थळपोझिशनवेळ२0१४आशियाई स्पर्धाइंचियोनदुसरी९.३५.३७२0१५एशियन चॅम्पियनशिपवुहान पहिली९.३४.१३२0१५वर्ल्ड चॅम्पियनशिपबीजिंग आठवी९.२९.६४