जयपूर : राजस्थानच्या क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेट खेळता यावे, यासाठी बीसीसीआयने अस्थायी समितीची स्थापना केली; पण बोर्डाचा हा पवित्रा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ललित मोदी यांचा गट बोर्डाच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करीत आहे. राजस्थान संघटनेत दोन गट असल्याचा फायदा बीसीसीआय घेत आहे. दोन गटांतील वादामुळे राजस्थान क्रिकेट संघटनेच्या कार्यालयाला टाळे लागले. खेळाडूंना स्थानिक सामन्यात ‘टीम राजस्थान’च्या नावाने खेळविण्यात आले होते.’’ नंदू म्हणाले, ‘‘राजस्थानात राज्याचा क्रीडा नियम लागू होतो, हे बीसीसीआयने ध्यानात ठेवावे. मोदी यांना राजस्थान संघटनेचे अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेद्वारे बनविण्यात आले. बीसीसीआयने त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. पण हायकोर्टाने राज्याच्या क्रीडा नियमांचा हवाला देत त्यांना निवडणूक लढविण्यास परवानगी बहाल केली होती. बीसीसीआयने लगेचच आरसीएला निलंबित केले व नंतर बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अमीन पठाण यांनी अविश्वास प्रस्तावाद्वारे मोदी यांना आरसीएप्रमुखपदावरून हटविले होते. पण या कृतीलादेखील न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.’’ अस्थायी समिती नेमण्याचा बीसीसीआयचा निर्णय न्यायालयाचा अपमान आहे. क्रीडा नियमांतर्गत अस्थायी समिती स्थानपनेचा अधिकार सहकार सोसायटीच्या रजिस्ट्रारकडे असतो. याच कारणामुळे बीसीसीआयने गतवर्षी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अस्थायी समिती स्थापन करण्याचा विचार सोडून दिला होता. - राजेंद्रसिंग नंदू, सचिव नागोर क्रिकेट संघटना
ललित मोदी गट आव्हान देणार
By admin | Updated: September 5, 2015 23:55 IST