बंगलोर : चेन्नई सुपरकिंग्जचा संघ शनिवारी चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेच्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे. आत्तार्पयत स्पध्रेत अपराजित राहिलेल्या कोलकातावर विजय मिळवणो चेन्नईसाठी तितकेसे सोपे नाही. याआधी हे दोन्ही संघ 2क्12मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले होते आणि त्यात कोलकाताने बाजी मारली होती. असे असले, तरी कोलकाताचा हुकमी एक्का सुनील नरीन फायनलमध्ये खेळणार नसल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 1-1 सामना जिंकले आहेत. बंगलोरच्या स्टेडियमवर चेन्नईने अधिक सामने खेळले असल्याने येथील परिस्थितीचा त्यांना चांगलाच अंदाज आहे. त्याचाच फायदा त्यांना शनिवारी मिळेल. तरीही आकडय़ांवर नजर टाकल्यास कोलकाता संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. संघाने या स्पध्रेत एकही लढत गमावलेली नाही आणि त्यांनी सलग 14 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे चेन्नईने आपल्या प्रतिस्पर्धीवर सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
कोलकाताकडे गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, जॅक कॅलिस आणि मनीष पांडेसारखे अनुभवी व दमदार फलंदाज आहेत आणि ते फॉर्मातही आहेत. गोलंदाजीत त्यांना नरीनची उणीव भासणार असली, तरी त्यांच्याकडे कुलदीप यादव व युसूफ पठाण, रियान टेन डोएशे आणि आंद्रे रसेल हे अष्टपैलू खेळाडू आहेत. दुसरीकडे चेन्नई संघात ड्वेन स्मिथ, ब्रँडम मॅक्युलम, सुरेश रैना हे फलंदाज आहेत. ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा हे अष्टपैलू खेळाडू त्यांचा हुकमी एक्का आहे. त्यांच्या जोडीला गोलंदाजीत आशिष नेहरा, आर अश्विन, मोहित शर्मा हे असल्याने संघाची बांधणी मजबूत झालेली आहे. (वृत्तसंस्था)