शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
3
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
4
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
7
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
8
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
9
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
10
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
11
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
12
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
13
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
14
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
15
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
16
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
17
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
18
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
19
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
20
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video

कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची

By admin | Updated: May 9, 2016 00:38 IST

जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे.

कॉलम एबी डिव्हिलियर्सजर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणार्‍या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. आरसीबीचा कर्णधार जबरदस्त फार्मात आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने आतापर्यंत ५४१ धावा फटकावल्या आहेत. त्यात दोन शतकी खेळींचा समावेश आहे. ९०.१६ ची त्याची सरासरी विशेष आहे. त्याने हे सर्व काही परंपरागत क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून साध्य केले आहे, हे विशेष. अखेरच्या षटकांमध्ये तो तोलून-मापून जोखीम पत्करतो. मी गेल्या आठवड्यांमध्ये त्याची फलंदाजी जवळून बघितली आहे. बरेचदा नॉन-स्ट्रायकर एन्डला उभे राहून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. मी त्याच्या आत्मविश्वासाचा प्रशंसक आहे. गॅपमध्ये फटके खेळण्याची त्याची योग्यता कमालीची आहे. तो आपला डाव चांगल्या पद्धतीने साकारतो. बेंगळुरूमध्ये त्याने पुणेविरुद्ध केलेली खेळी मास्टरक्लास होती. डावाच्या सुरुवातीला तो चांगल्या चेंडूचा आदर करण्यास कचरत नाही आणि आवश्यक धावगतीचे दडपणही त्याच्यावर नसते. गरज असेल तेव्हा चौकार-षटकारांच्या माध्यमातून लक्ष्य गाठता येते, याची त्याला कल्पना आहे. शनिवारी त्याने तेच केले. विराट आणि राहुल यांनी सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये केवळ १० धावा केल्या; पण त्यामुळे त्यांच्यावर दडपण आले नाही. चौथ्या षटकात राहुलने दुसर्‍या चेंडूवर षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर विराटने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषा दाखविली. आत्मविश्वास उंचावलेल्या फलंदाजाच्या बॅटमधून निघालेला हा योजनाबद्ध फटका होता. सहाव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या परेराच्या गोलंदाजीवर त्याने उंचावरून फटका मारत सहा धावा वसूल केल्या. आठव्या षटकात भाटियाच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला स्ट्रेट षटकार शानदार होता. हे दोन्ही फटके कॉपीबुक क्रिकेटप्रमाणे होते. नवव्या षटकात त्याने दोन चौकार ठोकले. त्यातील एक कव्हरमधून तर दुसरा मिडविकेटवर लगावलेला होता. त्यानंतर त्याने ११ व्या षटकात भाटियाच्या गोलंदाजीवर दोन चौकार ठोकले. शेन वॉटसन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना विराट एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर लक्ष केंद्रित करीत होता. १८व्या षटकात कोहलीने दोन षटकार व एक चौकार ठोकत १८ धावा वसूल केल्या. १९ व्या षटकात त्याने दोन षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर विजयी चौकार ठोकला. त्याने ५८ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०८ धावांची खेळी केली. विराट कोहलीची फलंदाजी विश्व दर्जाची आहे, यात दुमत नाही. (टीसीएम)