शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

कोहली-रहाणेची अर्धशतकी खेळी

By admin | Updated: December 6, 2015 03:13 IST

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित मालिकेतील पहिली शतकी भागीदारी नोंदवली आणि भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या

नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावित मालिकेतील पहिली शतकी भागीदारी नोंदवली आणि भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १९० धावांची मजल मारली. भारतीय संघाने एकूण ४०३ धावांची आघाडी घेत चौथ्या कसोटी सामन्यावर पकड अधिक मजबूत केली. अंधूक प्रकाशामुळे आज तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेच्या नऊ षटकांपूर्वी संपविण्यात आला. त्यावेळी कोहली (८३) व रहाणे (५२) खेळपट्टीवर होते. भारताची दुसऱ्या डावात ४ बाद ६७ अशी अवस्था असताना या जोडीने डाव सावरला. मालिकेत प्रथमच अर्धशतकी खेळी करणाऱ्या कोहलीने १५४ चेंडूंमध्ये १० चौकार ठोकले तर मालिकेतील एकमेव शतकवीर रहाणेने १५२ चेंडूंना सामोरे जाताना ५ चौकार मारले. भारताने आज कुर्मगती फलंदाजी करताना ८१ षटकांमध्ये १९० धावा फटकावल्या. पहिल्या सत्रात संघाने २६ षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात २ बळी गमावले तर दुसऱ्या सत्रात २८ षटकांमध्ये ६५ धावा वसूल करताना २ फलंदाजांचे मोल दिले. अखेरच्या सत्रात विकेट न गमाविता भारताने २७ षटकांमध्ये ७४ धावा फटकावल्या. मालिकेत विकेट न गमावलेले हे पहिले सत्र ठरले. भारताने पहिल्या डावात ३३४ धावा फटकावल्या आहे. प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १२१ धावांत संपुष्टात आला. यजमान संघाने २१३ धावांची भक्कम आघाडी घेतली, पण टीम इंडियाने पाहुण्या संघाला फॉलोआॅन न देण्याचा निर्णय घेतला. मालिकेत २-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ कोटलावर विजयासह मालिका ३-० ने जिंकण्यास उत्सुक आहे. यात यशस्वी ठरला तर भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेईल. भारताने मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी तर नागपूरमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात १२४ धावांनी विजय मिळवला आहे. आज दुसऱ्या डावात भारताची एकवेळ ४ बाद ५७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कोहली व रहाणे यांनी सावध पवित्रा स्वीकारीत संघाचा डाव सावरला. कोहलीने काही अंशी आक्रमक खेळी केली तर रहाणेने कर्णधारासोबत स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला. या दोघांनी ४८ व्या षटकात संघाला १०० चा पल्ला ओलांडून दिला. पहिल्या डावात मोठी आघाडी असल्यामुळे कोहली दडपण न बाळगता खेळला. चहापानानंतर डीन एल्गरच्या गोलंदाजीवर कव्हरमध्ये एक धाव वसूल करीत कोहलीने कारकिर्दीतील १२ तर मालिकेतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने एबोटच्या गोलंदाजीवर २ धावा घेत कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील आठवे अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने दिवसाच्या ८१ व्या षटकात मोर्कलच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत भारताची आघाडी ४०० धावांच्या पल्याड नेली, पण त्यानंतर अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी, आज भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मोर्कलने मुरली विजय (३) आणि रोहित शर्मा (००) यांना एकापाठोपाठ माघारी परतवत भारताची २ बाद ८ अशी अवस्था केली. त्यानंतर पुजारा व धवन यांनी सावधगिरी बाळगत संघाला २६ व्या षटकात अर्धशतक गाठून दिले. या दोघांनी ४५ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर पुजारा व धवन लवकरच माघारी परतले. लंचनंतरच्या तिसऱ्या षटकात मोर्कलच्या एका भेदक यॉर्करवर धवनचा (२१) त्रिफळा उडाला. पुजाराला (२८) इम्रान ताहिरने तंबूचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मोर्कलने १७ षटकांत २९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव ३३४. दक्षिण आफ्रिका पहिला डाव १२१. भारत दुसरा डाव :- मुरली विजय झे. विलास गो. मोर्कल ०३, शिखर धवन त्रि. गो. मोर्कल २१, रोहित शर्मा त्रि.गो. मोर्कल ००, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ताहिर २८, विराट कोहली खेळत आहे ८३, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५२. अवांतर (३). एकूण ८१ षटकांत ४ बाद १९०. बाद क्रम : १-४, २-८, ३-५३, ४-५७. गोलंदाजी : मोर्कल १७-६-२९-३, एबोट १७-६-३८-०, पीएट १८-१-५३-०, ताहिर २१-४-४९-१, एल्गर ८-१-१९-०.