कोहली टी-२०मध्ये नंबर वन
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
टी-२० मानांकनात अव्वल : विराटचा दुहेरी आनंदाचा क्षण
कोहली टी-२०मध्ये नंबर वन
टी-२० मानांकनात अव्वल : विराटचा दुहेरी आनंदाचा क्षणदुबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीयाच्यासाठी आजचा दिवस दुहेरी आनंद देणारा ठरला.त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २२ वर्षांनंतरश्रीलंकेच्या भूमीवर विजय पताका फडकाविल्या. तसेच,विराटने आयसीसीच्या ताज्या मानांकन यादीत टी-२०रॅँकिंगमध्ये टॉपचा फलंदाज होण्याचा मान मिळवला.सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीमानांकनानुसार, विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन फलंदाजॲरोन फिंचच्या जागी स्थान पक्के केले. फिंच हासोमवारी सामना खेळू शकला नव्हता. ज्यामुळे त्याला १७गुणांचे नुकसान सहन करावे लागले. या संधीचा फायदाकोहलीला मिळाला. कोहली आता फिंचपेक्षा ७ गुणांनीआघाडीवर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीदुसर्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनआणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथसुद्धा पुढे जाण्यास अपयशीठरले आहेत. मॉर्गनने ७४ धावा केल्या होत्या, तरीहीतो सहा स्थानांनी पिछाडीवर गेला. तो आता आठव्यास्थानी आहे. दरम्यान, पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघ एकास्थानाने पिछाडीवर गेला असून, ते आता तिसर्या स्थानावरआहेत. श्रीलंका संघ अजूनही अव्वल क्रमांकावर आहे,त्यानंतर पाकिस्तान संघाचा नंबर लागतो.