शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
4
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
5
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
6
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
7
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
8
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
9
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
10
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
11
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
12
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
13
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
14
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
15
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
16
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
17
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
18
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
19
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
20
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

कोहली खेळाच्या तंत्राशी तडजोड करीत नाही : सचिन

By admin | Updated: May 28, 2016 08:09 IST

भारताचा सध्याचा नंबर वन फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीतील रहस्य सरळ बॅटने खेळणे आणि खेळातील तंत्र पाळणे हेच असल्याचे मत माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त

दुबई : भारताचा सध्याचा नंबर वन फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीतील रहस्य सरळ बॅटने खेळणे आणि खेळातील तंत्र पाळणे हेच असल्याचे मत माजी कर्णधार सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे. कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वत:चे डावपेच आखत असल्याचे सचिनला वाटते. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘विराट सरळ बॅटने खेळतो. त्याचे फटके शैलीदार असतात. विशेष प्रतिभेचा धनी असलेला हा खेळाडू स्वत:च्या खेळावर मोठी मेहनत घेतो. त्याच्यातील शिस्त आणि समर्पितवृत्ती अनुकरणीय आहे. तंत्राशी कुठलीही तडजोड न करता तो फलंदाजी करतो. मानसिकरीत्या कणखर असल्याने दडपणातही त्याची फलंदाजी बहरत असते.’सचिनने आयपीएलचे कौतुक करीत आयपीएलचा स्तर उंचावल्याचे मत व्यक्त केले. सुरुवातीच्या सामन्यापासून अखेरच्या सामन्यापर्यंत या स्पर्धेत रोमांचकता टिकून असते. टी-२० मनोरंजक खेळ असून येथे प्रेक्षकांना चौकार आणि षटकार पहायला आवडतात; पण कसोटी क्रिकेट वेगळे आहे. हा प्रकार गोलंदाजांचे वर्चस्व गाजविणारा असावा. अन्य प्रकारात फलंदाजांना पूरक नियम असल्याने कसोटी क्रिकेट गोलंदाजांना झुकते माप देणारे असायला हवे. कसोटी क्रिकेट कुठल्याही खेळाडूसाठी कायम आव्हानात्मक राहील. कौशल्य, धैर्य, क्षमता आणि संयम यांची कसोटी क्रिकेटमध्ये परीक्षा होत असते. हा प्रकार आणखी रोमहर्षक व्हावा, यासाठी काही बदल करण्याचा विचार करण्यात यावा.’ (वृत्तसंस्था)