शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कोहली, एबीचा धडाका

By admin | Updated: May 17, 2016 07:06 IST

नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दणदणीत विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सला ९ विकेटस्ने लोळवले

कोलकाता : मोक्याच्या वेळी फॉर्ममध्ये आलेल्या धडाकेबाज ख्रिस गेलने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर कर्णधार विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दणदणीत विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सला ९ विकेटस्ने लोळवले. या धमाकेदार विजयासह बेंगळुरुने प्ले आॅफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात बेंगळुरुने नाणेफेक जिंकून यजमान कोलकाताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार गौतम गंभीर व मनीष पांडे यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ५ बाद १८३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. यानंतर बंगलोरने सहज बाजी मारताना केवळ ख्रिस गेलच्या मोबदल्यात ८ चेंडू राखून दणदणीत बाजी मारली. आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून खराब फॉर्मशी झगडणारा गेल या सामन्यात लौकिकाप्रामाणे खेळला. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार व ४ षटकार ठोकून ४९ धावांचा तडाखा दिला. सुनील नरेनने पायचित पकडल्याने गेलचे अर्धशतक एका धावाने हुकले. यानंतर कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी नाबाद ११५ धावांची भागीदारी करून संघाचा विजय साकारला. कोहलीने ५१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारासह नाबाद ७५ धावा कुटल्या, तर डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावांचा तडाखा दिला. तत्पूर्वी, गंभीर व पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करून कोलकाताला सावरले. गंभीरने ३४ चेंडूत ७ चौकारांसह ५१ धावा केल्या, तर पांडे ३५ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५० धावा काढून परतला. बेंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर उथप्पाला (२) अब्दुल्लाने झटपट माघारी परतवत बेंगळुरूला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार गंभीर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करीत डाव सावरला. आंद्रे रसेल (३९) व शाकिब (१८) यांनी सहाव्या विकेटासाठी २८ चेंडूंमध्ये ५८ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक मजल मारुन दिली. बेंगळुरूतर्फे अरविंदने दोन तर अब्द्ुल्ला व चहल यांनी प्रत्येक एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलककोलकाता नाईट रायडर्स : २० षटकात ५ बाद १८३ धावा (गौतम गंभीर ५१, मनीष पांडे ५०, आंद्रे रसेल नाबाद ३९, श्रीनाथ अरविंद २/४१) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु : १८.४ षटकात १ बाद १८६ धावा (विराट कोहली नाबाद ७५, एबी डिव्हिलियर्स नाबाद ५९, ख्रिस गेल ४९, सुनील नरेन १/३४)