शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

विजयासाठी केकेआर उत्सुक

By admin | Updated: May 25, 2016 03:09 IST

फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर ‘करा अथवा मरा’ लढतीत सरशी साधत अंतिम चार संघांत स्थान मिळवणारा व दोनदा जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स

नवी दिल्ली : फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर ‘करा अथवा मरा’ लढतीत सरशी साधत अंतिम चार संघांत स्थान मिळवणारा व दोनदा जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला बुधवारी एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबाद संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या लढतीत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवणाऱ्या केकेआर संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. गुणतालिकेत बऱ्याच कालावधीपर्यंत अव्वल स्थानावर राहिलेल्या सनरायझर्स संघाला गेल्या लढतीत २२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे त्यांना एलिमिनेटर लढतीत खेळावे लागले. सनरायझर्सने १४ सामन्यांत ८ विजय मिळवले आणि ६ लढतींत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या खात्यावर १६ गुणांची नोंद होती, पण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या तुलनेत नेटरनरेटमध्ये पिछाडीवर पडल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. केकेआरविरुद्ध लीग फेरीत त्यांना दोन्ही लढतींमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी केकेआर संघाला गेल्या लढतीत कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक होते. केकेआरचा हुकमी एक्का फिरकीपटू सुनील नारायणने योग्य वेळी सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. केकेआर संघाला दोनदा जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नारायणला यंदाच्या मोसमात लीग फेरीतील अखेरची लढत वगळता लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, पण आता त्याला सूर गवसला आहे. लेगस्पिनर पियुष चावलाच्या स्थानी संधी मिळालेल्या यादवने महिनाभरानंतर लीगमध्ये आपली दुसरी लढत खेळताना चमकदार कामगिरी केली. २०१२ व २०१४ चा चॅम्पियन केकेआर संघाच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार गौतम गंभीर, फॉर्मात आलेला बिगहिटर युसूफ पठाण, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांच्या कामगिरीवर राहील. केकेआरचा स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे खेळू शकला नाही. (वृत्तसंस्था)बुधवारच्या लढतीपर्यंत तो फिट होईल, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे. गोलंदाजीमध्ये नारायण व यादव यांनी शानदार कामगिरी केली आहे, तर वेगवान गोलंदाजांकडून गंभीरला चमकदार कामगिरीची आशा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता गेल्या लढतीत १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला १४९ धावाच करता आल्या. हैदराबाद संघाची भिस्त कर्णधार डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि युवराज सिंग यांच्या कामगिरीवर अवलंबूून आहे. दुखापतग्रस्त असल्यामुळे साखळी फेरीत केवळ सात सामने खेळणाऱ्या युवराजला अद्याप वैयक्तिक अर्धशतक नोंदविता आले नाही. मोठ्या लढतीचा खेळाडू मानल्या जाणाऱ्या या स्टार अष्टपैलूकडून संघाला शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. सनरायझर्स संघाच्या यशाचे रहस्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. भुवनेश्वर कुमारने १४ सामन्यांत १८ बळी घेतले आहेत. आरसीबीच्या युजवेंद्र चहलनंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने १४ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. केकेआरविरुद्ध गेल्या लढतीत त्याने १९ व्या षटकात गोलंदाजी करताना केवळ तीन धावा दिल्या होत्या. युवा वेगवान गोलंदाज बरिंदर सरणची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे.प्रतिस्पर्धी संघकोलकाता नाईट रायडर्स :- गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब-अल-हसन, पियुष चावला, सुनील नारायण, जेसन होल्डर, मोर्नी मॉर्केल, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, ख्रिस लिन, ब्रॅड हॉग, कॉलीन मुन्रो, शॉन टेट, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, मनन शर्मा, राजागोपाल सतीश, जयदेव उनाडकट.सनराझर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, युवराज सिंग, मोझेस हेन्रिक्स, इयान मॉर्गन, दीपक हुडा, नमन ओझा, कर्ण शर्मा, मुस्तफिजूर रहमान, भुवनेश्वर कुमार, बरिंदर सरण, ट्रेंट बोल्ट, बेन कटिंग, केन विलियम्सन, आशिष रेड्डी, रिकी भुई, बिपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, अभिमन्यू मिथुन, विजय शंकर, टी. सुमन, आदित्य तारे.