शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

केकेआर आरसीबीविरुद्ध विजयासाठी उत्सुक

By admin | Updated: May 2, 2016 02:12 IST

दोनदा जेतेपदाचा मान मिळविणारा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध (आरसीबी) खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयासह इंडियन प्रीमिअर

बेंगळुरू : दोनदा जेतेपदाचा मान मिळविणारा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ आज, सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध (आरसीबी) खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयासह इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या पर्वात गुणतालिकेत दुसऱ्या स्थान पटकावण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. नाईट रायडर्सने संघाने ७ सामन्यात ८ गुणांची कमाई केली असून, हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने चार सामने जिंकले आहे तर तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबी संघाने सहा सामन्यांत केवळ दोन विजय मिळविले असून, चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. केकेआर आणि आरसीबी या दोन्ही संघांना गेल्या लढतींमध्ये अनुक्रमे दिल्ली डेअरडेव्हिल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत केकेआर संघाचे पारडे वरचढ मानल्या जात आहे. दिल्लीविरुद्ध १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाचा डाव १८.३ षटकांत १५९ धावांत संपुष्टात आला. केकेआर संघासाठी चिन्नास्वामी स्टेडियमचे मैदान ‘लकी’ ठरले आहे. येथे त्यांनी अंतिम फेरीत किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करीत दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळविला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ शानदार फॉर्मात आहे. संघातील फलंदाजांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गंभीरने सात सामन्यांत तीनदा अर्धशतक झळकावले आहे तर रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण आणि आंद्रे रसेल यांचीही त्याला योग्य साथ लाभली आहे. उथप्पाने शनिवारी डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या लढतीत ५२ चेंडूंना सामोरे जाताना ७२ धावांची खेळी केली होती. केकेआर संघाची गोलंदाजीची भिस्त सुनील नारायण, उमेश यादव व पीयूष चावला यांच्यासारख्या गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. हे गोलंदाज आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्यात कसे यशस्वी ठरतात, याबाबत उत्सुकता आहे. आरसीबी संघाची भिस्त पुन्हा एकदा फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, लोकेश राहुल आणि शेन वॉटसन यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. गेल परतल्यामुळे आरसीबी संघाची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. कर्णधार कोहलीची नजर संघाला विजय मिळवून देण्यावर केंद्रित झाली आहे. त्यासाठी गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. आरसीबी संघाला सनरायझर्सविरुद्ध १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वॉटसनची फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. युजवेंद्र चाहल, केन रिचर्डसन, इकबाल अब्दुल्ला व वरुण अ‍ॅरोन यांच्यासारख्या गोलंदाजांना अद्याप छाप सोडता आलेली नाही. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाईटरायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), पीयूष चावला, जॉन हास्टिंग्स, बॅ्रड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅकसन, कुलदीप यादव, ख्रिस लिन, मनन शर्मा, मोर्ने मोर्कल, कोलिन मुनरो, सुनील नारायण, मनीष पांडे, युसूफ पठाण, अंकित राजपूत, आंद्रे रसेल, राजगोपाल सतीश, साकीब अल हसन, जयदेव उनादकट, रॉबिन उथप्पा, सूर्यकुमार यादव आणि उमेश यादव.रॉयल चॅलेंजर्स : कोहली (कर्णधार), वॉटसन, गेल, डिव्हिलियर्स, स्टुअर्ट बिन्नी, तबरेज शम्सी, इकबाल अब्दुल्ला, श्रीनाथ अरविंद, जाधव, विक्रमजित मलिक, रिचर्डसन, अ‍ॅरोन, मनदीप सिंग, नेचिम, मिल्ने, स्टार्क, युजवेंद्र चाहल, हर्षल पटेल, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वाइसी, सचिन बेबी, लोकेश राहुल, परवेज रसूल, विकास टोकस, प्रवीण दुबे आणि अक्षय कर्णेवार.