शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पुढील लढतींमध्ये केकेआरच ‘फेव्हरिट’!

By admin | Updated: April 21, 2017 01:56 IST

कोलकाता नाईट रायडर्सला तीन दिवसांत दोन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर केकेआरची रविवारी गाठ पडेल

- सौरभ गांगुली लिहितो...कोलकाता नाईट रायडर्सला तीन दिवसांत दोन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर केकेआरची रविवारी गाठ पडेल ती बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध. सध्या केकेआर विजयी घोडदौड करीत आहे. पण आयपीएलचा हा सुरुवातीचा टप्पा आहे, हे ध्यानात घ्यावे लागेल. परिस्थिती झटपट बदलू शकते. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यातील कामगिरीमुळे केकेआर संघ सुखावला. मोठ्या स्पर्धेत खेळताना कुठल्याही संघाला सुरुवातीचे धक्के बसणे स्वाभाविक आहे. पण त्यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरते. केकेआरने सुरुवातीला तीन षटकांत तीन गडी गमावल्यानंतरही परिस्थितीवर विजय मिळविण्यात यश संपादन केले. संघाच्या यशासाठी वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे. युसूफ पठाणच्या त्या दिवशीच्या खेळीने संघ व्यवस्थापनाचा आत्मविश्वास परतला. ख्रिस लीनच्या दुखापतीनंतर आपण खंदा फलंदाज गमावल्याच्या वेदना व्यवस्थापनाला होत असाव्यात. पण गरज असताना मनीष पांडे आणि पठाण यांनी दमदार खेळी करीत उणीव भरून काढली. मनीष हा फारच उपयुक्त खेळाडू आहे. तो आपल्या संघात असायला हवा, असे प्रत्येक संघाला वाटत असावे. पुढील दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात आज गुजरात लायन्सशी गाठ आहे. या लढतीत केकेआर निश्चितपणे विजयाचा दावेदार वाटतो. गुजरातची फलंदाजी-गोलंदाजी अडखळल्यासारखी दिसत आहे. दुसरीकडे केकेआरचे फिरकी गोलंदाज त्यांच्या तुलनेत वरचढ ठरले. सुनील नारायण, कुलदीप यादव, पीयूष चावला यांचा मारा कुठल्याही खेळपट्टीवर भेदक ठरत असल्याने १६० किंवा १८० धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघांच्या ‘नाकीनऊ’ आणण्याचे कसब त्यांच्या माऱ्यात आहे. गुजरात संघाला यश मिळवायचे झाल्यास त्यांचे फिरकी गोलंदाज लवकर फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. स्पर्धेत टिकून राहण्याची हीच वेळ आहे; अन्यथा वेळ निघून गेल्याने बाहेर पडण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. ख्रिस गेलला संधी देत आरसीबीने शहाणपणा दाखविला. पुनरागमनासोबतच गेलला सूर गवसला, हे विशेष. याआधीही गेलने संघासाठी यशस्वी कामगिरी केली असल्याने मोक्याच्या क्षणी गेलकडून अशीच कामगिरी होत राहावी, अशी मनोमन इच्छा कर्णधार कोहलीनेदेखील बाळगली असावी. केकेआरला आरसीबीकडून मोठे आव्हान मिळेल, यात शंका नाही. पण सध्याचा केकेआरचा फॉर्म पाहता माझ्या मते दोन्ही सामन्यांत केकेआरचीच सरशी होईल, असे दिसते. (गेमप्लान)