शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

खो-खो स्पर्धा - श्री समर्थ आणि विद्यार्थी यांना अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 22:55 IST

हर्ष कामतेकर व प्रणाली मेंढी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

मुंबई :- लायन्स क्लब ऑफ माहीम व मुंबईखो-खो संघटना यांच्या संयुक्त आयोजना खाली तसेच विद्यार्थी क्रीडा केंद्रच्या विशेष सहकार्याने किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लाल मैदान, परळ, मुंबई येथे पार पडली. किशोरी गटाच्या अतितटीच्या अंतिम  सामन्यात  श्री समर्थ व्यायाम मंदिराने  अमर हिंद मंडळाचा ०४-०२ (०२-०१-०२-०१) असा २ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला घेतलेली एक गुणांची आघाडी श्री समर्थने नेटाने टिकवली व विजेतेपद मिळवले. श्री समर्थकडून खेळताना  प्रणाली मेंढीने नाबाद २:१०, ५:१० मिनिटे संरक्षणकेले व आक्रमणात १ खेळाडू बाद केला. तर आकांक्षा कोकाशने नाबाद ४:५०, नाबाद १:४० मिनिटे संरक्षण केले. मधुरा मालपने आक्रमणात २  खेळाडू बाद केले. अमर हिंद तर्फे रुद्रा नाटेकरने नाबाद ५:१० नाबाद ५:०० मिनिटे संरक्षण केले. निधी पेडणेकरने १:००, १:२० मिनिटे संरक्षण करत चांगला खेळ केला.

किशोर गटाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने युवक क्रीडा मंडळाचा ११-०८ (०२-०२ व ०४-०४ व ०५-०२) असाजादा डावात ३ गुणांनी पराभव केला. सामना मध्यंतराला २-२ असा असताना दुसऱ्या डावात ४ गुण विद्यार्थीने मिळवत सामना जिंकला असे वाटत असताना युवकांच्या छोट्याखानी आक्रमकांनी ४ गुण टिपत सामना बरोबरीत नेला. मात्र जादा डावात विद्यार्थीने आक्रमणाची धार वाढवत सामना जिंकला.  विद्यार्थी तर्फे खेळताना हर्ष कामतेकरने ५:२०, २:१० मिनिटे संरक्षण करून अष्टपैलू खेळ केला. जनार्दन सावंतने आक्रमणात २ गडी बाद केले. अथर्व पालवने १:१०, ४:३० मिनिटे संरक्षणकरून आक्रमणात १ गडी बाद केला. युवक कडून खेळताना ओंकार घवाळीने नाबाद ३:५०, २:४० मिनिटे संरक्षणकेले. राज सुर्वेने १:४०, १:३० मिनिटे संरक्षण करत १ गडी बाद केला. अमित पालने १:३०, १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात १ गडी बाद केला. 

किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम समर्थ व्यायाम मंदिराने अमर हिंद मंडळाचा ०८-०२  असा ६ गुणांनी पराभव केला तर किशोरी गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वरने सरस्वती मंदिर हायस्कूलचा ०२-०१ असा १  गुण २ मिनिटे राखून पराभव केला.

टॅग्स :Kho-Khoखो-खोMumbaiमुंबई