शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला २ सुवर्णपदके; अ‍ॅथलेटिक्समध्ये आकाशचे रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:37 IST

मधुराने २० किलोमीटर शर्यतीत ३० मिनिटे ३६.५९४ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले.

गुवाहाटी : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या तिसऱ्या सत्रात सायकलिंग प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आश्वासक कामगिरी करताना रविवारी दोन सुवर्णपदके जिंकली. २१ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये मधुरा वायकर आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पूजा दानोळे यांनी बाजी मारली.

मधुराने २० किलोमीटर शर्यतीत ३० मिनिटे ३६.५९४ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. मेघा जी. आणि सौम्या अंतापूर या कर्नाटकच्या खेळाडूंना अनुक्रमे दुसºया आणि तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. पूजा १७ वर्षांखालील मुलींच्या १५ किलोमीटर शर्यतीत विजेती ठरली.

१७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या आकाशसिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. १०.९५ सेकंद वेळ देणारा झारखंडचा सदानंदकुमार या गटातील वेगवान धावपटू ठरला. २१ वर्षांखालील मुलींची १०० मीटर धावण्याची शर्यत केरळच्या अ‍ॅन्सी सोजन हिने १२.२१ सेकंद वेळेसह जिंकली. १२.३८ सेकंद वेळ देणाºया महाराष्ट्राच्या कीर्ती भोईटेच्या वाट्याला कांस्यपदक आले. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये २१ वर्षांखालील मुलांच्या गटात ओंकार शिंदेने ६८.७० गुणांसह महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. ७२.३० गुण घेणारा उत्तर प्रदेशचा गौरवकुमार सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अभय गुरवने २१ वर्षांखालील उंच उडीत आणि पूर्वा सावंतने १७ वर्षांखालील तिहेरी उडीत दबदबा राखताना महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक पटकावले. अभयने २.०७ मीटरची सुवर्ण झेप घेतली. तसेच पूर्वाने पहिल्याच ११.८९ मीटरची उडी घेत आपले वर्चस्व राखले.