शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

खेलो इंडिया २०२० : गुवाहाटीला क्रीडा राजधानी बनविण्याचे ध्येय; वाचा खास मुलाखत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 20:51 IST

आसामच्या मुख्यमंत्र्यांशी 'लोकमत'ने साधला संवाद

रोहित नाईक, गुवाहाटी : ‘खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धाचे यजमानपद गुवाहाटीला मिळाल्याचा आनंद आहे. आसामसाठी ही मोठी संधी असून गुवाहाटी शहराला क्रीडा राजधानी बनविण्याचे आमचे ध्येय आहे,’ असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. ‘यंदा खेलो इंडिया स्पर्धेत विविध खेळांसह संपूर्ण भारताचे सांस्कृतिक दर्शनही घडेल,’ असा विश्वासही सोनोवाल यांनी व्यक्त केला. ९ ते २२ जानेवारीदरम्यान गुवाहाटी येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन होईल. स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष असून गतविजेता महाराष्ट्र यावेळी आपल्या सांघिक जेतेपदाचा बचाव करण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त सोनोवाल यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना स्पर्धेच्या तयारीची माहिती दिली.आसाममध्ये क्रीडा वातावरण तयार करण्यावर भर असल्याचे सांगताना सोनोवाल म्हणाले की, ‘हिमा दास आसामची शान आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत अनेक युवा खेळाांकडे वळू लागले. यासाठी आम्ही राज्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा निर्णय घेतला असून याअंतर्गत तिरंदाजी, फुटबॉल यासारख्या विविध खेळांचे विशेष विद्यालयही उभारण्यात येईल. खेळांमुळे समाज एकवटला जातो. शिक्षण, संस्कृती आणि क्रीडा या तीन गोष्टींमुळे समाज एकत्र येतो. यामुळेच यंदाच्या स्पर्धेत खेळांसोबतच सांस्कृतिक दर्शनही घडविण्यात येईल.’ 

आसामच्या खेळाडूंना मिळणार रोख पारितोषिक युवा खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, तसेच त्यांना भविष्यात चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेतील आसामच्या पदक विजेत्या खेळाडूंना विशेष रोख पारितोषिक देण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला आहे. यानुसार सुवर्ण विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. 

‘आसाम सुरक्षित! कोणतीही चिंता नको’काही दिवसांपूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध गुवाहाटीत तीव्र निदर्शने झाली होती. यादरम्यान शहरामध्ये कफर््यूही लावण्यात आला होता, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असून स्पर्धेदरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही खेलो इंडिया यूथ गेम्सचे सीईओ अविनाश जोशी यांनी दिली. यासंदर्भात ते म्हणाले की, ‘नक्कीच काही दिवसांपूर्वी गुवाहाटीमध्ये तणावपूर्ण स्थिती होती, परंतु आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून येथे कोणालाही त्रास होणार नाही.  खेळाडूंच्या वास्तव्याच्या ठिकणी व स्पर्धा ठिकाणी कडक सुरक्षा असेल. याशिवाय खेळाडूंच्या प्रवास मार्गावर व वाहनांमध्येही सुरक्षा रक्षक तैनात असतील. त्यामुळे गुवाहाटी पूर्णपणे सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतली आहे.’ 

देशाच्या संस्कृतीचे दर्शनस्पर्धेदरम्यान आसामव्यतिरिक्त देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे दर्शन होईल. यासाठी आयोजकांनी प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी संपर्क करुन त्यांना कार्यक्रमाची कल्पना दिली आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारताची संस्कृती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळेल. त्याचप्रमाणे काही खेळाडू सांस्कृतिक कला सादर करण्यास उत्सुक असल्यास त्यांनाही आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तीन दिवसांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदाच्या स्पर्धेत अनोखा ठरेल. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती राहणार असल्याची माहिती यावेळी मिळाली.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया