दोन्ही गटात सुवर्ण जिंकले : पुरुष व महिला संघांकडून इराण पराभूत
इंचियोन : राकेशकुमार, जसबीर, मंजित चिल्लर आणि अनुप यांनी शेवटच्या सहा मिनिटांत केलेल्या आक्रमक आणि अफलातून खेळामुळे भारतीय पुरुष कबड्डी संघाने इराणचा 27-25 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव करीत सलग सातव्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी भारतीय महिला संघानेसुद्धा इराणचा 31-21 गुणांनी पराभव करून सुवर्णपदक आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळविले.
पुरुषांच्या झालेल्या अंतिम लढतीत शेवटच्या सहा मिनिटांर्पयत इराण संघाचे वर्चस्व राहिले. पण अखेरची काही मिनिटे राहिलेली असताना भारतीय खेळाडूंनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कमबॅक करीत इराणच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. नाणोफेक जिंकून भारताने इराणला चढाई बहाल केली. इराणने पहिल्याच चढाईत गुण घेत संघाचे खाते खोलले. यानंतर इराणने मागे वळून पाहिले नाही. 7व्या मिनिटाला इराणने भारतावर पहिला लोण देत 13-7 अशी गुणांची आघाडी घेतली. या वेळी भारतीय संघातील अव्वल खेळाडूंचेसुद्धा इराणच्या खेळाडूंनी काही चालू दिले नाही. इराणच्या खेळाडूंनी केलेली पकड आणि त्यांची आक्रमणाची शैली उत्कृष्ट होती. मध्यंतराला इराणकडे 21-13 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र भारताच्या जसबीर, अनुप व राकेशकुमारने उत्कृष्ट खेळ करीत गुणफलक सारखा वाढवत ठेवला. मोक्याच्या क्षीण संघनायक राकेशने 2 गडी तर टिपलेच; पण 2 पकडीदेखील यशस्वी केल्या. त्यानंतर अनुपने एकाच चढाईत 3 गडी बाद केल्यामुळे भारताने मध्यंतरानंतर लोणची परतफेड केली व 19-21 अशी आघाडी कमी केली. शेवटची 6 मिनिटे शिल्लक असताना भारताच्या अनुपने इराणच्या खेळाडूची अप्रतिम पकड करीत 24-24 अशी बरोबरी केली. पुन्हा इराणच्या खेळाडूची पकड करून गुण संख्या 25-24 अशी केली, तेव्हा शेवटीची चार मिनिटे राहिली होती. नंतर राकेशने पुन्हा इराणच्या खेळाडूची पकड करीत 26-24 अशी स्थिती केली. नंतर अनुप आक्रमणासाठी गेला आणि त्याची पकड इराणच्या खेळाडूंनी केली. तेव्हा गुणसंख्या 26-25 अशी झाली. शेवटची 1.5 मिनिटे राहिली असताना इराणचा खेळाडू आक्रमणासाठी आला. त्यावर ‘करा किंवा मरा’ अशी वेळ आली होती. त्याने भारतीय मैदानात दोन वेळा गडी बाद करण्याचा प्रयत्न केला; पण त्या यश आले नाही. आणि त्याच वेळी तो शेवटचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असताना भारताच्या मंजीत चिल्लर, राकेश आणि अनुप यांनी त्याची पकड केली आणि स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. भारतीय कबड्डीप्रेमींनी सुटकेचा नि:श्वास घेतला.
4भारताने या सामन्यात इराणवर लोण देत 2 गुण, बोनस करीत 2 गुण; चढायांमधून 14 गुण, तर यशस्वी पकडी करीत 9 गुण असे 27 गुण प्राप्त केले. राकेशने 4 चढायांत 3 झटापटीचे गुण, तर यशस्वी पकडी करून 4 गुण मिळविले. एक वेळा त्याची पकड झाली.
4अनुपने 16 चढायांत 8 झटापटीचे व 1 बोनस असे 9 गुण मिळविले. 3 वेळा त्याची पकड झाली. जसबीरने
11 चढायांत 4 झटापटीचे
व 1 बोनस असे 5 गुण मिळविले. 3 वेळा त्याची पकड झाली.
4इराणने भारतावर पहिला लोण देत 2 गुण; बोनस करीत 2 गुण चढाया मधून 13 गुण; तर यशस्वी पकडी करीत 8 गुण असे 25 गुण मिळविले. या सामन्यात खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले.
4महिलांच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताच्या महिलांनी देखील इराणचे कडवे आव्हान 31-21 असे परतवित सलग दुस:यांदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
4भारताने 8 व्या मिनिटाला इराणवर लोण देत 12-7 अशी आघाडी घेतली. मध्यंतराला ती 15-11 अशी होती. मध्यंतरानंतर 7 व्या मिनिटाला दुसरा लोण देत भारताने 26-16 अशी आघाडी वाढविली. 5 मिनिटे शिल्लक असताना 28-16 अशी भारताकडे आघाडी होती. शेवटी 1क् गुणांनी भारताने बाजी मारली.
4भारताने इराणवर 2 लोण देत 4 गुण; चढाईत 18 गुण, यशस्वी पकडी करीत 9 गुण असे 31 गुण मिळविले. या सामन्यात भारताला एकही बोनस गुण मिळविता आला नाही.
4भारताची संघनायिका तेजस्विनी हिने 14 चढायांत 6 गुण मिळविले, तर 2 वेळा तिची पकड झाली. 2 पकडी तिने यशस्वी केल्या.
4ममताने 1क् चढायांत 5 गुण मिळविले, तर 1 वेळा तिची पकड झाली.
4अभिलाषाने 8 चढायांत 5 गुण मिळविले. 1 वेळा तिची पकड झाली.
4किशोरी शिंदे हिने 4 यशस्वी पकडी केल्या. या स्पर्धेत मध्यरक्षक म्हणून तिने अतिशय उत्तम कामगिरी केली. उजवा मध्यरक्षक म्हणून ती चीनच्या भिंतीसारखी उभी राहिली.
4इराणने चढायांमधून 12 गुण करीत
5 गुण तर यशस्वी पकडी करीत
4 गुण, असे 21 गुण प्राप्त केले.
तायक्वांदोमध्ये मारिया, शालू पराभूत
इंचियोन- आशियाई क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोतील भारताचे आव्हान आज
मारिया रेगी आणि शालू राईकवार यांच्या पराभवाने संपुष्टात आले. महिला
गटात या दोन्ही खेळाडूंना पराभवाचे तोंड पाहावे
लागले. यापूर्वी पुरुष
गटातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला होता.
स्पर्धेच्या 14 व्या दिवशीही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली.
व्हॉलिबॉल स्पर्धेत भारत पाचव्या स्थानी
भारताने आज कतारच्या संघाला व्हॉलिबॉलच्या सामन्यात 3-2 असे
नमवत आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. पुरूषांच्या
संघाने आज खेळल्या गेलेल्या या सामन्यात कतारच्या संघाला 47 मिनिटे चाललेल्या लढतीत 25/21, 2क्/25, 22/2क्, 25/15, 15/1क् असे पराभूत केले. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर भर दिला.
हातोडाफेक स्पर्धेत मंजु बालाला रौप्य
हातोडाफेक स्पर्धेत कांस्यपदक
पटकावलेल्या मंजू बाला हिला रौप्यपदक मिळाले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील
अंतिम लढतीत रौप्यपदक मिळालेली
चीनची खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याने मंजू बालाला फायदा झाला आहे. अॅथलेटिक्सच्या पदाधिका:यांनी या बाबीला दुजोरा दिला आहे. या स्पर्धेत मंजूने
6क्.47 मीटर गोळाफेक करत पदक पटकावले होते.
गेल्या वर्षीचा अनुभव पाहता आम्ही सुरुवातीपासून टेक्निकवर जास्त भर दिला होता. त्यामुळे आम्हाला त्याचा जास्त फायदा झाला. दुसरे महत्त्वाचे म्हणजे इराण संघाच्या सर्व खेळाडू 68-69 किलो वजनाच्या होत्या. आमच्या संघात सर्व खेळाडू त्यांच्या पेक्षा वजनाने कमी होत्या. त्यामुळे आम्ही या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत जास्त करुन टेक्निकने जास्त खेळत होतो. संघाची कर्णधार तेजस्विनी, ममता, किशोरी शिंदे आणि माङयात चांगला समन्वय तयार झाल्यामुळे लढतीदरम्यान कोणी काय करायचे हे सांगावे लागत नव्हते. -अभिलाषा म्हत्रे, भारतीय संघाची रायडर