शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

आशियाईतील पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी श्रीकांत सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 06:15 IST

K. Srikanth: गेल्या काही महिन्यांपासून फाॅर्मशी झगडणारा भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत खेळातील उणिवा दूर केल्यानंतर पहिल्यांदा आशियाई पदक जिंकण्यासाठी हांगझोउमध्ये मैदानावर उतरणार आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून फाॅर्मशी झगडणारा भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत खेळातील उणिवा दूर केल्यानंतर पहिल्यांदा आशियाई पदक जिंकण्यासाठी हांगझोउमध्ये मैदानावर उतरणार आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारणारा श्रीकांत २०२३मध्ये २१व्या स्थानावर घसरला आहे. तो २०१४ आणि २०१८ आशियाई स्पर्धेत अनुक्रमे अंतिम १६ आणि  अंतिम ३२ फेरीपुढे जाऊ शकला नव्हता. गुंटूरच्या या ३० वर्षीय  खेळाडूने राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद अशा प्रमुख स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहे. त्यामुळे त्याचे लक्ष्य आशियाई स्पर्धेतील पदक दुष्काळ संपवण्याचे आहे.

श्रीकांतने निवड चाचणीत  अव्वल स्थानावर राहिल्यानंतर आशियाई स्पर्धेसाठीच्या संघात  स्थान मिळवले. त्यामुळे तो या  संधीचा लाभ घेण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. श्रीकांतने पीटीआयला सांगितले की, आशियाई स्पर्धेतील माझ्या आठवणी चांगल्या नाहीत. याआधी दोनवेळी मी वैयक्तिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो होतो. अशातच जर यावेळी चांगला खेळलो तर काहीतरी मिळवण्यात यशस्वी ठरेन. 

आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक वगळता मी सर्वत्र पदके जिंकले  आहे. त्यामुळे मला येथेही अशा कामगिरीचा विश्वास वाटतो. चार वर्षांतून ही स्पर्धा होते त्यामुळे मी मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.  

सर्वोत्तम कामगिरीला नाही पर्यायआशियाई स्पर्धेच्या तयारीबाबत तो म्हणाला की, ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धांची तयारी कोणत्याही सुपर सिरीज स्पर्धेच्या तुलनेत थोडी वेगळी असते. मी वर्षात १०-१५ स्पर्धांमध्ये सहभागी होतो. पण आशियाई स्पर्धा चार वर्षांतून एकदा होत असल्यामुळे तुम्हाला संघात स्थान मिळवणे आवश्यक असते. क्रमवारीत २० च्या आत असलेला खेळाडूही संघात स्थान मिळवेलच असे नाही. आशियाई खेळाडूंचा दबदबा असल्यामुळे पदक जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. श्रीकांत सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.    

टॅग्स :Kidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतBadmintonBadminton