शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

ज्युनिअर टीम इंडियाचे खाण्याचे वांदे

By admin | Updated: February 8, 2017 23:53 IST

निश्चलीकरण आणि बीसीसीआयविरुद्ध लोढा समितीवादाचा फटका इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ज्युनिअर टीम इंडियाला (१९ वर्षांखालील) चांगलाच बसला आहे.

मुंबई : निश्चलीकरण आणि बीसीसीआयविरुद्ध लोढा समितीवादाचा फटका इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ज्युनिअर टीम इंडियाला (१९ वर्षांखालील) चांगलाच बसला आहे. लोढा समितीविरुद्धचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने खेळाडू, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अन्य सहकाऱ्यांना दैनंदिन खर्चासाठी पैसे मिळत नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांचे खाण्याचेही वांदे झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरुद्ध लोढा समिती हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची गच्छंती झाल्याने बीसीसीआयमध्ये आर्थिक व्यवहाराचे अधिकार अद्याप कोणालाही देण्यात आलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना ‘टीम इंडिया’साठी आवश्यक असलेले आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, १९ वर्षांखालील संघ जोहरी यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे या संघाची दैन्यावस्था झाली आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघाची राहण्याची सोय महागड्या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. तेथे नाष्टा मोफत आहे. मात्र जेवणासाठी पैसे आकारले जातात. हा खर्च भागवताना खेळाडूंची चांगलीच तारेवरची कसरत होत आहे. कोणी आपल्या वैयक्तिक खर्चाने, तर कोणी पालकांकडून खर्चासाठी पैसे घेऊन दिवस ढकलत आहे. सध्या इंग्लंड (१९ वर्षांखालील) संघ एका महिन्याच्या भारत दौऱ्यावर आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडचा ३-१ असा धुव्वा उडविला. मात्र आर्थिक त्रासामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)नोटाबंदीमुळे आठवड्यात २४ हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. यामुळे दैनंदिन खर्च रोखीने देण्यावर मर्यादा येत आहेत. सध्या तरी संघाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र मालिका संपताच खेळाडू आणि सहकाऱ्यांच्या खात्यात दैनंदिन खर्चाचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या वतीने देण्यात आली आहे.‘१५०० रुपयां’चे एक सॅन्डवीचइंग्लंड १९ वर्षांखालील संघ भारतात पाच एकदिवसीय सामने व कसोटी सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ महागड्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असला तरी तेथे रात्रीचे जेवण स्वखर्चाने करावे लागत आहे. हॉटेलमध्ये एक सॅन्डवीच १५०० रुपयांचे असल्याचे खेळाडूंनी सांगितले.