शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

जितू रायचा सुवर्णवेध

By admin | Updated: March 2, 2017 00:10 IST

उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला.

नवी दिल्ली : जितू रायने पुन्हा एकदा एकाग्रतेचा उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला. अमनप्रीतसिंग रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. जितू रायने मंगळवारी दहा मीटर पिस्तुलमध्ये कांस्य जिंकल्यानंतर स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.सेनेचा जवान असलेल्या जितूने कर्णीसिंग शूटिंग रेंजवर २३०.१ असा विश्वविक्रमी स्कोअर नोंदविला. दुसरीकडे, फायनलमध्ये बऱ्याच वेळा आघाडीवर राहिलेल्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. इराणचा नेमबाज वाहीद गोलखांदन २०८.० गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अंतिम फेरी गाठणारा २९ वर्षांचा जितू ८ नेमबाजांमध्ये सहाव्या स्थानावर होता. त्यानंतर बाद फेरीत १०.८ गुण नोंदविताच तो सहाव्यावरून तिसऱ्या स्थानावर आला; शिवाय कझाकिस्तानच्या नेमबाजाला त्याच्यामुळे बाहेर व्हावे लागले. त्यानंतरच्या पुढील २ फेऱ्यांमध्ये आणखी सरस कामगिरीसह जितू पहिल्या स्थानावर पोहोचला. अमनप्रीत माघारताच त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पूजा घाटकरने विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अंकुर मित्तलने ट्रॅपमध्ये रौप्य आणि रायने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकले होते. राय आणि हिना सिद्धू यांच्या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले होते; पण ही केवळ चाचणी स्पर्धा असल्याने पदक विचारात घेतले जात नाही. (वृत्तसंस्था) >सुवर्ण जिंकल्यानंतर जितू म्हणाला, ‘‘माझी सुरुवात खराब झाली; पण खेळात चढउतार चालायचेच. मला खेळातील अनिश्चितता चांगली वाटते. असे झाले नाही, तर खेळातील रोमांचकपणा संपुष्टात येईल. २०१६च्या सत्राचा शेवट मी विश्वचषकात रौप्य विजयाने केला होता. २०१७ मध्ये देशासाठी शानदार सुरुवात करण्याचे स्वप्न पाहिले होते. यंदादेखील म्युनिच विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न जोपासले आहे.’’ ५५९ रायने याआधी पात्रता फेरीत ५५९ गुण मिळविल्याने आघाडीवर असलेल्या अमनप्रीतच्या (५६१ गुण) तुलनेत तो माघारला होता. >महिलांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुलमध्ये मुस्कान ५७६ गुणांसह १२ व्या आणि राही सरनोबत २३व्या स्थानावर राहिल्या. महिला स्कीट प्रकारात रश्मी राठोड १७ व्या, आरती सिंग २४ व्या आणि सानिया शेख २७ व्या स्थानावर राहिल्या.>देशात प्रथमच आयोजित विश्वचषकात चाहत्यांपुढे सुवर्ण जिंकणे शानदार ठरले. हा मोठा सन्मान आहे. भारतीय तिरंगा उंचावताना पाहणे सुखद वाटते. - जितू राय, सुवर्णविजेता