शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जीतू रायला सुवर्ण, मेहुलीला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 04:27 IST

भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले.

गोल्ड कोस्ट : भारतीय नेमबाज जीतू राय याने अपेक्षेनुसार कामगिरी करीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नव्या स्पर्धा विक्रमासह सोमवारी सुवर्ण जिंकले. युवा मेहुली घोषला महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात शूट आऊटपर्यंतच्या थरारक रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता रायने २३५.१ गुणांची नोंद केली. भारताचाच ओमप्रकाश मिठारवाल याला कांस्य तसेच दहा मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला हिला कांस्य मिळाले. १७ वर्षांच्या मेहुलीने १०.९ गुणांची कमाई करीत लढत शूटआऊटपर्यंत खेचली होती. त्याचवेळी सिंगापूरची प्रतिस्पर्धी मार्टिना लिंडसे व्हेलोंसो हिने १०.३ तर मेहुलीने ९.९ गुणांची नोंद करताच सिंगापूरला सुवर्ण पदक मिळाले. गत चॅम्पियन चंदेला २२५.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली. चंदेलाने चार वर्षांआधी नोंदविलेला राष्टÑकुलचा स्वत:चाच पात्रता विक्रम मोडीत काढला. मेक्सिकोत आयएसएफ विश्वचषकाची सुवर्ण विजेती मेहुलीने अंतिम फेरीत सरस कामगिरी करीत आपल्याच सहकारी खेळाडूला मागे टाकले. पुरुषांच्या स्किट फायनलमध्ये समित शाह सहाव्या स्थानावर घसरला. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये मिठारलवालने पात्रता फेरीत ५८४ गुणांसह नवा विक्रम नोंदविला पण अखेरच्या आठ नेमबाजांत त्याला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.>पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू दुखापतीमुळे बाहेरराष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेली पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू न्यूझीलंडची भारोत्तोलनपटू लारेल हबार्डला खांद्याचे हाड सरकल्यामुळे माघार घ्यावी लागली. ४० वर्षीय लारेल हबार्डने एक दशकापूर्वी लिंग बदल करताना गेव्हिनची लारेल झाली. या स्पर्धेत तिचे टीकाकारहीकमी नव्हते आणि चाहतेही भरपूर आहेत. समोआचे भारोत्तोलन प्रशिक्षक जेरी वालवर्क म्हणाले, तिला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देणे चुकीचे होते कारण तिच्यामध्ये एका पुरुषाप्रमाणे शक्ती आहे.हबार्ड म्हणाली, ‘मला येथे चाहत्यांकडून बरेच प्रेम मिळाले. सुरुवातीला मला भीती वाटत होती. मी आॅसी नागरिकांचे आभार मानते.’ हबार्ड ९० किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३२ चा विक्रम नोंदवण्याच्या प्रयत्नात होती, पण तिच्या खांद्याचे हाड सरकले.