शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

जीतू, हीनाला आशियाई पदक, भारताची पदकसंख्या १७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:22 IST

दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

नवी दिल्ली : दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. जीतू याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक गटात कांस्यपदकासह शाहजार रिज्वी आणि ओंकार सिंह यांच्यासोबत सांघिक गटात सुवर्णपदकही पटकाविले. दुसरीकडे, महिला गटात हीना हिने १० मीटर गटात कांस्यपदकासह श्री निवेथा परमाथन आणि हरवीन सराओ यांच्यासोबत सांघिक गटात रौप्यपदक पटकाविले.पहिल्या दोन दिवसांत ११ पदके पटकाविणारा भारतीय संघ तिसºया दिवशी १७ पदकांवर पोहोचला. आता भारताकडे ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्यपदके झाली आहेत. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रिज्वी हा क्वालिफिकेशनमध्ये ५८३ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. जीतूने क्वालिफाइंगमध्ये ५७७ गुणांसह पाचवे स्थान पटकाविले. रिज्वीसोबत आठ नेमबाजांनी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. ओंकार ५७५ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. तो फायनलमध्ये जागा मिळवू शकला नाही; परंतु जीतू आणि रिज्वी यांच्यासोबत त्याने सांघिक गटात १७३५ गुणांसह सुवर्णपदक मिळवून दिले. चीन १७२९ गुणांसह दुसºया, तर व्हिएतनाम १७२८ गुणांसह तिसºया क्रमांकावर राहिला. भारताच्या त्रिकुटाने एकूण ११३२ गुणांसह रौप्यपदक पटकाविले. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत