शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जैशाने विशेष रिफ्रेशमेंट नाकारले होते!

By admin | Updated: August 25, 2016 20:55 IST

रिओ आॅलिम्पिकमधील मॅरेथॉनदरम्यान मला कुठल्याही प्रकारचे विशेष रिफ्रेशमेंट नको. त्याची काहीही गरज नसल्याचे ओपी जैशा हिने स्वत: म्हटले होते.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25  :रिओ आॅलिम्पिकमधील मॅरेथॉनदरम्यान मला कुठल्याही प्रकारचे विशेष रिफ्रेशमेंट नको. त्याची काहीही गरज नसल्याचे ओपी जैशा हिने स्वत: म्हटले होते.  तिचे खासगी कोच निकोलाय स्रेसारेव यांनीच ही कबुली दिल्याने जैशाने सुरू केलेला वाद नव्या वळणावर पोहोचला आहे. बेलारुसचे असलेले निकोलाय यांनी जैशाला विशेष रिफ्रेशमेंटची गरज राहीलका, अशी विचारणा केली होती. पण जैशाने त्यास नकार दिला. त्यानंतर रेसदरम्यान जैशाला विशेष रिफ्रेशमेंट लागणार नसल्याचे आपण भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेला कळविले होते, असे निकोलाय यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राष्ट्रीय विक्रमाची मानकरी जैशा हिने आरोप केला होता की, कडक उन्हात आयोजित मॅरेथॉनदरम्यान भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेने पिण्याचे पाणी आणि एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे धावताना मला जीव गेल्याचा भास होत होता. एएफआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र जैशाचा आरोप खोटा ठरविला.

बेंगळुरुच्या साई केंद्रात बोलताना निकोलाय म्हणाले,जैशाने याआधी मॅरेथॉनदरम्यान कधीही पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्सचा वापर केला नाही. मॅरेथॉनच्या एक दिवसापूर्वी मुख्य कोचचे सहायक राधाकृष्ण नायर यांनी माझ्याकडे जैशासाठी ड्रिंक्स किंवा पाण्याची गरज आहे काय अशी विचारणा केली होती. मी जैशाला ही बाब सांगितली. तिने केवळ साधारण पाण्याची मागणीकेली. तेव्हा जैशा रेसदरम्यान साधारण पाणी घेणार असल्याचे मी एएफआयला कळविले होते. जैशाने आॅलिम्पिकच्या तयारी दरम्यानही कधी विशेष ड्रिंक्स घेतले नाही. ती साधारण पाण्याचा वापर करीत असे. २०१६ मध्ये जैशाने कधीही विशेष ड्रिंक्स घेतले नाही.

रिओमध्ये आयोजकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली होती का, असे विचारताच निकोलाय म्हणाले,ह्यअसे नव्हते. मी रेसमध्ये धावलो नाही. संपूर्ण ४२ किमी जैशासोबत नव्हतो. काही अंतरापर्यंतचे चित्र मी सांगू शकतो. माझी नजर जिथवर जात होती, तिथे पाण्याची व्यवस्था होती. या रेसमध्ये एकूण १५७ धावापटू धावले. ७० व्या स्थानावर आलेला धावपटू आणित्याच्या कोचकडे विचारणा केली तेव्हा त्याने पाण्याची व्यवस्था २५-३० किमीनंतर होती आणि ती पुरेशी नसल्याचे सांगितले होते. मी जैशासोबत बोललो तेव्हा तिने देखील हा प्रकार सांगितला. २५ किमीनंतर पाण्याचीव्यवस्था(स्पजिंग पार्इंट) हे मॅरेथॉनमधील आदर्श स्थान नव्हे इतकेच मी सांगू शकतो