शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा अनुभव कमी

By admin | Updated: June 27, 2017 01:25 IST

ग्रॅहम फोर्ड यांनी पदाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकेल इतका महेला जयवर्धनेकडे अद्यापही

कोलंबो : ग्रॅहम फोर्ड यांनी पदाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकेल इतका महेला जयवर्धनेकडे अद्यापही अनुभव नसल्याचे श्रीलंका क्रिकेटचे (एसएलसी) अध्यक्ष थिलंगा सुमतिपाल यांचे म्हणणे आहे.सुमितपाल म्हणाले, ‘सीनिअर प्रशिक्षकाच्या रूपाने अजूनही महेलाकडे अनुभवाची कमतरता आहे. तो टी-२0 फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या रूपाने चांगला होऊ शकतो.’ मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आणि माजी राष्ट्रीय संघाचा कर्णधार जयवर्धनेचे काही सहकारी अजूनही राष्ट्रीय संघात असल्याचेही त्यांनी म्हटले.जबरदस्त कारकीर्दीनंतर २0१४ मध्ये निवृत्ती घेणाऱ्या जयवर्धनेचा क्रिकेटमधील सर्वात जास्त तज्ज्ञ लोकांत समावेश केला जातो. जयवर्धने व त्याचा सहकारी कुमार संगकारा यांनी एकाच वेळी निवृत्ती घेतल्यानंतर त्यातून श्रीलंकेचा संघ अद्यापही सावरूशकला नाही. एका वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले फोर्ड यांनी कथितपणे सुमतिपाल यांच्या व्यवस्थापनेसोबत मतभेद झाल्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला होता.२0११ पासून जवळपास ९ अंतरिम आणि स्थायी प्रशिक्षकांनी श्रीलंकन संघासोबत काम केले आहे. एसएलसी सूत्रांनुसार, ते बांगलादेशचे विद्यमान प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे यांच्याशी संपर्क करण्याचा विचार करीत आहेत; परंतु बांगलादेशसह त्यांचा करार २0१९ ला संपणार आहे. फोर्ड यांचा उत्तराधिकारी म्हणून स्टीफन फ्लेमिंग, स्कॉट स्टायरीस व टॉम मुडी यांच्या नावाचीही चर्चा आहे. (वृत्तसंस्था)