शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
3
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
4
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
5
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
6
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
8
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
9
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
10
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
11
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
13
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
14
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
15
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

धावपटू जैशाचे आरोप बिनबुडाचे !

By admin | Published: August 24, 2016 4:05 AM

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताची धावपटू ओ.पी. जैशाने स्पर्धेदरम्यान उष्ण वातावरण असताना अधिकाऱ्यांनी पाणी व एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था केली नसल्याचे आरोप केले होते. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मात्र जैशाचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.सर्व देशांचे दोन किलोमीटर अंतरावर स्टॉल होते, पण आपल्या देशाचा स्टॉल रिकामा होता.’ जैशा मॅराथॉन पूर्ण केल्यानंतर फिनिश लाईनवर कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशिक्षक निकोलई स्नेसारेव्ह यांचा एका डॉक्टरसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांना १२ तासांसाठी पोलीस ठाण्यात राहावे लागले. एएफआयने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘प्रत्येक संघाला आपले वैयक्तिक ड्रिंक बुथवर ठेवण्याची परवानगी असते. त्यावर संघ आणि खेळाडूच्या पसंतीचे मार्क असते. या नियमानुसार मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ व्यवस्थापक १६ बॉटल्स (जैशा व कवितासाठी प्रत्येकी ८) घेऊन प्रशिक्षक निकोलेई स्नेसारेव्ह यांच्याकडे त्यांच्या रुममध्ये गेले होते. संघव्यवस्थापकाने त्यांना एनर्जी ड्रिंक्सबाबत आवड कळविण्यास सांगितले होते. त्यामुळे खेळाडूंच्या गरजेनुसार त्यावर मार्क लावून बुथवर ठेवण्यासाठी आयोजकांना देता आले असते.’ एएफआयच्या मते, या प्रकरणात दोन्ही खेळाडूंनी (जैशा व कविता) प्रस्ताव फेटाळून भारतीय व्यवस्थापकला वैयक्तिक एनर्जी ड्रिंक्सची गरज नसल्याचे सांगितले. जर गरज भासली तर आयोजकांच्या बुथवरून ड्रिंक्स घेणार असल्याचे कळवले होते.’ (वृत्तसंस्था)>जैशाने आयोजकांवर केलेले आरोपरिओ आॅलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणारी जैशा २ तास ४७ मिनिट १९ सेकंद वेळेसह ८९ स्थानावर राहिली. जैशा म्हणाली, ‘तेथे उष्ण वातावरण होते. स्पर्धेला सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. आमच्यासाठी ना पाणी होते ना एनर्जी ड्रिंक होते. केवळ एकदा ८ किलोमीटर अंतरावर रिओ आयोजकांतर्फे मला पाणी मिळाले. त्याची काही मदत झाली नाही. >चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापनक्रीडा मंत्रालयाने जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मंगळवारी दोन सदस्यांची स्थापन केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, ‘क्रीडा व युवा कल्याण मंत्री विजय गोयल यांनी जैशाने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समित स्थापन केली आहे. त्यात संयुक्त सचिव क्रीडा ओंकार केडिया आणि क्रीडा संचालक विवेक नारायण यांचा समावेश आहे.’ समित सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.>कवितानेही फेटाळले आरोपओ.पी. जैशाने भारतीय अधिकारी बेजबाबदार असल्याचा आरोप केला असला तरी अन्य मॅरेथॉनपटू कविता राऊतने मात्र हे आरोप फेटाळून लावल्यामुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे. या स्पर्धेत सहभागी अन्य भारतीय धावपटू कविता राऊतने मात्र एएफआयची पाठराखण करताना जैशाचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कविताने म्हटले की, भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने पाणी व एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते आणि त्यांच्याविरुद्ध माझी कुठली तक्रार नाही. महासंघाने मॅरेथॉनदरम्यान मला ड्रिंक्स उपलब्ध करून दिले होते, पण मीच नकार दिला. मी केवळ माझ्याबाबत सांगत आहे. कारण मला धावताना सहद किंवा ग्लुकोज घेण्याची सवय नाही.’>नियमानुसार जर एखादा खेळाडू बाहेरच्या व्यक्तीकडून एनर्जी ड्रिंक्स घेत असेल तर त्याला अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी पाणी किंवा एनर्जी ड्रिंक्स पुरविले नाहीत, हा ओ.पी. जैशाने केलेला आरोप चुकीचा आहे. - एएफआय