शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Breaking : 2020 ऑलिम्पिकबाबत महत्त्वाचा निर्णय, जपानच्या पंतप्रधानांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 18:29 IST

कॅनडानं ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आयोजक जपान यांच्यावर दबाव वाढला.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टोक्योत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. अखेरीस मंगळवारी ही स्पर्धा 2021मध्ये घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी फोनवरून ही चर्चा केली आणि निर्णय घेतला. पुढील वर्षी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा घेण्याचे ध्येय असल्याचे अॅबे यांनी सांगितले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पर्धा पुढे ढकलावी लागली आहे. या निर्णयाने जपानला प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.  

कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना सराव करता येत नाही. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 57 टक्के खेळाडू पात्र ठरले आहेत. ''ही स्पर्धा रद्द करणे अवघड आहे, परंतु ती आता पुढे ढकलण्यात येत आहे. खेळाडूंचे आरोग्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,'' असे अॅबे यांनी सांगितले. त्यादृष्टीनं अॅबे आणि बॅच  यांच्यात मंगळवारी चर्चा झाली आणि त्यांनी ही स्पर्धा पुढील वर्षी म्हणजेच 2021मध्ये खेळवण्यावर एकमत दर्शवले. जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Japanजपानcorona virusकोरोना वायरस बातम्या