शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

जलतरण, जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 06:56 IST

खेलो इंडिया यूथ गेम्स : यजमान संघाचे ४१ सुवर्णपदकांसह अव्वलस्थान कायम

- अमोल मचाले

पुणे : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अव्वलस्थान पटकविण्याचा निर्धार केलेल्या यजमान महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही पदकतालिकेत अव्वलस्थान कायम राखले. शनिवारी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारांत चमकदार कामगिरी करीत महाराष्टÑाच्या खेळाडूंनी प्रत्येकी चार सुवर्णपदके जिंकली.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य अशी एकूण २३ पदके जिंकली. आतापर्यंत महाराष्ट्राने ४१ सुवर्ण, ३२ रौप्य आणि ४२ कांस्यपदकांसह एकूण ११५ पदकांची कमाई करीत दिल्ली आणि हरियाणा या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे.

जलतरणात आज महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना चार सुवर्ण आणि तीन रौप्य अशी एकूण सात पदकांची कमाई केली. १७ वर्षांखालील मुलींच्या ४०० मीटर मेडले प्रकारात अपेक्षा फर्नांडिस अव्वल ठरली. तिने ५ मिनिटे २३.३६ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. कन्या नायर (मध्य प्रदेश) आणि श्रुंगी बांदेकर (गोवा) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक प्राप्त केले.१७ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात निशा गुप्ताने ५९.७८ सेकंद वेळेसह सुवर्णपदक आपल्या नावे केले. २१ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या साध्वी धुरी हिने १ मिनिट १.०२ सेकंद वेळेसह बाजी मारली. कर्नाटकच्या दीक्षा रमेश हिने रौप्य, तर गोव्याच्या सुमन पाटीलने कांस्यपदक मिळविले.

मुलांच्या जलतरणात महाराष्ट्राच्या मिहीर आम्ब्रे याने २१ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक मिळवले. कर्नाटकच्या अविनाश मणी याला रौप्यपदक मिळाले. २१ वर्षांखालील मुलांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुश्रुत ४ मिनिटे १०.७५ सेकंद वेळेसह दुसरा आला. दिल्लीच्या कुशाग्र रावत याने (४.१.८३) सुवर्णपदक पटकाविले. २१ वर्षांखालील मुलींच्या १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ऋतुजा तळेगावकर १८ मिनिटे ५३.३६ सेकंद वेळेसह दुसरी आली. तमिळनाडूची डी. भाविका (१८.१३.०७) सुवर्णपदकाची मानकरी ठरली.

२१ वर्षांखालील मुलांच्या ४ बाय १०० मीटर मेडले प्रकारात महाराष्टाच्या वाट्याला रौप्यपदक आले. श्वेजल मानकर, मिहीर आम्ब्रे, जय एकबोटे आणि अरॉन फर्नांडिस यांच्या संघाने ४ मिनिटे १.७० सेकंदांची वेळ दिली. कर्नाटकच्या संघाने सुवर्ण पटकावलेजिम्नॅस्टिकमध्ये जिगरबाज कामगिरी जिम्नॅस्टिक प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिगरबाज कामगिरी करीत चार सुवर्ण आणिदोन रौप्य अशी सहा पदके शनिवारी आपल्या नावे केली. ही सर्व पदके २१ वर्षांखालील गटातील खेळाडूंनी जिंकली.

मुलींच्या रिबन प्रकारात अदिती दांडेकर हिने किमया कदम हिला मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. अदितीने ४५.४०, तर किमयाने ४१ गुण मिळविले. मुलींच्या अनइव्हन बार प्रकारात वैदेही देऊळकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. मुलांच्या रोमन रिंग प्रकारामध्ये ओंकार शिंदे १२.०५ गुणांसह अव्वल ठरला.

ज्युदोमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला एक रौप्य आणि कांस्यपदक आले. २१ वर्षांखालील मुलांच्या ७३ किलो गटात निशांत गुरवने रौप्यपदक मिळवले. २१ वर्षांखालील मुलींच्या ४८ किलो गटात विद्या लोहार कांस्यपदकाची मानकरी ठरली. नेमबाजीत हर्षवर्धन यादवने २१ वर्षांखालील गटात कांस्यपदक मिळवले.