शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जयपूर कबड्डी चॅम्पियन

By admin | Updated: September 1, 2014 04:24 IST

२००८ साली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या नव्या अध्यायाच्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता आणि रविवारी प्रो कबड्डी लीगचा पहिला मान राजस्थानची राजधानी जयपूरने पटकावला

स्वदेश घाणेकर, मुंबईकबड्डीतही असे होऊ शकते.... आपला मऱ्हाटमोळा खेळ जागतिक स्थरावर गेला खरा, परंतु तो प्रसिद्धीपासून नेहमी अलिप्त राहिला... मात्र प्रो कबड्डी लीगने या खेळाला संजीवनी दिली.... याला केवळ योगायोगच म्हणावे लागेल... २००८ साली इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या नव्या अध्यायाच्या जेतेपदाचा मान राजस्थान रॉयल्सने पटकावला होता आणि रविवारी प्रो कबड्डी लीगचा पहिला मान राजस्थानची राजधानी जयपूरने पटकावला. बॉलिवुड स्टार अभिषेक बच्चन याच्या जयपूर पिंक पँथर्स संघाने यजमान यू मुंबावर ३५-२४ असा एकहाती विजय मिळवला. यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील अंतिम लढत पाहण्यासाठी मुंबईचे एनएससीआय स्टेडियम खचा खच भरले होते. याच उभय संघांनी या नव्या अध्यायाचा श्री गणेशा केला होता, परंतु त्या लढतीत मुंबाने सलामी दिली आणि रविवारी समारोपाच्या लढतीत पँथर्संनी त्याची सव्याज परतफेड केली. यू मुंबा.... यू मुंबा... यू मुंबा अशा जयघोषाने स्टेडियम दणाणले होते... जणू त्यांनी मुंबईला जेतेपद बहालचे केले होते. मात्र, पँथर्सला उशिरा सापडलेली लय अखेरच्या लढतीपर्यंत कायम होती.मनिंदर सिंह याने पहिल्याच चढाईत त्याची प्रचिती दिली. मात्र मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने त्याला उत्तर दिले. अनुपने दुसऱ्या चढाईत पँथर्सचा कर्णधार नवनीत गौतम, राजेश नरवाल आणि प्रशांत चव्हाण या हुकमी एक्क्यांना बाद करून मुंबईला आघाडी मिळवून दिली. चौथ्या मिनिटात ४-२ अशा आघाडीवर असलेल्या मुंबाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले, परंतु मनिंदर सिंह याने एका चढाईत मुंबाचे दोन गडी टिपून सामना ४-४ असा बरोबरीत आणला. दोन्ही संघ तुल्यबळ खेळ करत होते. सामन्यात चुरस पाहायला मिळणार हे निश्चित असल्याने प्रेक्षकांमधला जल्लोष ओसंडून वाहत होता. पहिल्या हाफमध्ये जयपूरने १८-१४ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफमध्ये मैदानावर त्यांचे केवळ ४ खेळाडूच उपस्थित असल्याने मुंबाकडे लोन चढवण्याची संधी होती, परंतु जयपूरने आखलेल्या योजनेसमोर त्यांला यातही अपयश आले. जयपूरने दमदार खेळ करत हळूहळु सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. ३०व्या मिनिटाला त्यांनी पुन्हा एक लोन चढवून २७-१५ अशी आघाडी घेत विजय जवळपास पक्का केला. त्यानंतर मुंबईचे मनोबल खचले... जयपूरने ही लढत ३५-२२ अशी जिंकून प्रो कबड्डीच्या जेतेपदाचा मान आपल्या पारड्यात पाडला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पटना पाइरेटस् संघाने बेंगलूर बुल्सवर ७ गुणांनी विजय मिळविला.