शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

ही तर मीडियाची टोलेबाजी : शुक्ला

By admin | Updated: September 23, 2015 23:17 IST

बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षाच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल याची चाचपणी केवळ मीडियातच होत आहे.

कानपूर : बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षाच्या खुर्चीवर कोण विराजमान होईल याची चाचपणी केवळ मीडियातच होत आहे. या विषयावर कुठलीही चर्चा सुरू नसताना केवळ टोलेबाजी ऐकायला मिळते. अध्यक्षपदाचा निर्णय आमसभेला घ्यायचा असल्याचे मत आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला यांनी बुधवारी व्यक्त केले.अध्यक्षपदाच्या शर्यतीत शुक्ला यांचेही नाव आले आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी आलेले शुक्ला यांना यासंदर्भात विचारताच ते म्हणाले,‘ याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल. जी नावे येत आहेत त्या केवळ अफवा आहेत. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर हे लवकरच आमसभा बोलावतील. आमसभा नव्या अध्यक्षांचा निर्णय घेईल. जोवर आमसभा बोलविण्यात येत नाही तोवर माझ्यामते नव्या अध्यक्षाबाबत अफवा पसरविण्यात येऊ नये.’कोण अध्यक्ष होईल, याबाबतच्या अफवांना मीडियामध्ये ऊत आले आहे. पण माझ्यामते हे योग्य नाही. जोपर्यत बैठक होत नाही तोपर्यंत अंदाज वर्तविण्यात अर्थ नाही, असे सांगून स्वत: अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याच्या प्रश्नावर शुक्ला म्हणाले,‘कोण चढाओढीत आहे हे मी आताच कसे सांगू शकेन. याबाबत मला अधिक बोलायचे नाही.’नवी दिल्ली : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोण, याविषयी डावपेच आखण्यासाठी बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या विश्वासू लोकांना औपचारिकरीत्या निमंत्रण दिले आहे. बेंगळुरु येथे ही बैठक होईल. या बैठकीसाठी श्रीनिवासन यांनी विश्वासातील आठ-नऊ जणांना बोलविल्याची माहिती आहे. या बैठकीत आमसभेत काय बोलायचे याचे डावपेच ठरणार असून दिवंगत अध्यक्ष दालमिया यांच्या जागी कुणाला बसवायचे याबद्दल विचार करण्यात येणार आहे. श्रीनिवासन यांचे विश्वासू तसेच एका राज्य संघटनेचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बेंगळुरु येथे भेटीसाठीचे आमंत्रण मिळाले आहे. भविष्यात काय घडू शकते याचे संकेत मिळतील. अध्यक्षपदाचे दावेदार असलेले अमिताभ चौधरी हे स्वत: पूर्व आणि द. विभागातील काही पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहतील. कॅबने घेतलेल्या निर्णयानुसार बंगाल क्रिकेट संघटनेचा कुठलाही पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार नाही. दरम्यान बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी देखील पडद्यामागे पूर्व विभागाच्या प्रतिनिधींसोबत संपर्क सुरू केला.पूर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही गटांना त्यांनी देखील आमंत्रित केल्याचे कळते. ठाकूर हे अध्यक्षपदासाठी शुक्ला यांच्या नावाची शिफारस करीत आहेत. विशेष असे की मागच्या निवडणुकीत शुक्ला हे कोषाध्यक्षपदाच्या लढतीत हरियाणाचे अनिरुद्ध चौधरी यांच्याकडून पराभूत झाले होते. दरम्यान अध्यक्ष बनण्याच्या मुद्यावर स्वत: शुक्ला हे तोंड उघडायला तयार नाहीत. (वृत्तसंस्था)