शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

तिकिटासाठी १५ तासांपूर्वीच लागली रांग

By admin | Updated: October 6, 2015 01:25 IST

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

- क्रिकेट पाससाठी फुकट्यांची फिल्डिंग

कानपूर : भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा फ्री पास मिळविण्यासाठी सरकारी बाबूंपासून पोलीस, मंत्री, राजकीय नेते व पत्रकार यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. पण, या विविध यंत्रणांकडून होत असलेल्या फुटक पासच्या मागणीमुळे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना मात्र हैराण झाली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या ग्रीन पार्क मैदानावर पहिला एकदिवसीय सामना होत आहे. या विविध सरकारी यंत्रणांतील अधिकाऱ्यांकडून क्रिकेट संघटनेकडे या सामन्याच्या फ्री पासची मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर जेवण, शीतपेय, चहा यांसाठीदेखील फ्री कूपनाची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने तर, आम्हाला प्रदेश मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना पास द्यायचे आहेत; त्यामुळे अधिक पास देण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचा एक अधिकारी म्हणाला, ‘‘जिल्हा प्रशासनाकडून आमच्याकडे तब्बल ६ हजार पास देण्याची मागणी करण्यात आली आहे. इतके पास देणे आम्हाला शक्य नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळापासून उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटना यांना आम्हाला पास द्यावे लागतील.’’तसेच, याशिवाय त्यांच्या भोजनाची व्यवस्थादेखील आम्हाला करावी लागेल. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच लाखो रुपये किमतीच्या व्हीआयपी बॉक्सवर आपला अधिकार राखून ठेवला आहे. असे असूनही त्यांच्याकडून मोफत पास मागितले जात आहेत. त्यामुळे आम्हाला असे पास देणे कठीण असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)

१५ तास आधीच रांगा..-क्रिकेट सामन्याचे तिकीट मिळावे, यासाठी ग्रीन पार्क मैदानाबाहेर विद्यार्थी गॅलरीसाठी चाहत्यांनी तिकीटविक्री सुरू होण्यापूर्वी १५ तास आधीच रांग लावली होती. -सोमवारी सकाळी दहा वाजता तिकीटविक्री सुरू होणार होती. तब्बल एक हजार क्रिकेट चाहत्यांनी रात्रीपासूनच रांग लावली होती. तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर हा आकडा अडीच हजारांच्या वर गेला. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती. -तिकीटविक्री सुरू झाल्यानंतर उसळलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी हे वृत्त फेटाळले आहे. लाठीमार केला नसून, गर्दीला आवरण्यासाठी पोलीस बळ वापरल्याचे एसएसपी शलभ माथूर यांनी सांगितले.