शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच मुद्द्यांवर बोलणे अशक्य- राज्यवर्धनसिंग राठोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:46 IST

केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड म्हणाले,‘माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबतीत वक्तव्य करू शकत नाही.’

नवी दिल्ली : विश्व अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासच्या इंग्रजीबाबत भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाच्या (एएफआय) टिपणीबाबत प्रतिक्रिया मागितली असता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड म्हणाले, ‘माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबतीत वक्तव्य करू शकत नाही.’ लोकसभेत आज प्रश्नाच्या तासाला गौरव गोगोई यांनी पुरवणी प्रश्न विचारताना राठोड यांना हिमा दासबाबत एएफआयच्या टिपणीवर स्पष्टीकरण मागितले होते. सुरुवातीला राठोड यांनी याबाबत काहीच मत व्यक्त केले नाही, पण गोगोई यांनी वारंवार जोर दिल्यानंतर ते म्हणाले, माझ्यावर मोठी जबाबदारी असून मी प्रत्येक बाबीवर टिपणी करू शकत नाही. राठोड यांच्या या वक्तव्यावर गोगोईसह काँग्रेसच्या अन्य खासदारांनी विरोध दर्शविला. राठोड यांच्या उत्तरदरम्यान गोगोई त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागत होते.क्रीडा मंत्र्यांकडे स्पष्टीकरणा मागणाºया विरोधी पक्षाच्या काही सदस्यांना बसण्याची विनंती करताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, त्यांनी (राठोड यांनी) कुठलीही अशी चूक केलेली नाही. युवा मंत्री असून चांगले कार्य करीत आहेत, असेही अध्यक्षा म्हणाल्या.हिमा दासने पदक पटकावल्यानंतर ट्विटमध्ये एएफआयने म्हटले होते की, पहिल्या विजयानंतर मीडियासोबत बातचित करताना हिमाची इंग्रजी एवढी चांगली नव्हती. पण, तिने चांगला प्रयत्न केला. आम्हाला त्याचा अभिमान आहे.त्यानंतर टीका झाल्यावर महासंघाने खेद व्यक्त करताना आमची धावपटू कुठल्याही आव्हानाला घाबरत नाही, हे दाखविण्याचा आमचा उद्देश असल्याचे म्हटले होते. आमच्या टिष्ट्वटमुळे ज्या भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याबाबत आम्ही त्यांची माफी मागतो, असेही महासंघाने स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)>खेळातील राजकारण संपायला हवेभारतीय खेळातून राजकारणसंपायला हवे, असे मत क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केले. लोकसभेत प्रश्नाच्या तासात काँग्रेस सदस्य रंजित रंजन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राठोड बोलत होते.>आयओएची शुक्रवारी बैठक । क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावावर होणार चर्चापदकाची शक्यता बळावण्यासाठी आशियाई स्पर्धेसाठी निवडीच्या निकषामध्ये सूट देण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीनंतर भारतीय आॅलिम्पिक महासंघाने (आयओए) भविष्यातील कार्यवाहीसाठी शुक्रवारी आपल्या कोअर व विधी समितीची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.क्रीडा मंत्रालयाने बुधवारी आयओएला आवाहन केले होते की, खेळ व खेळाडूंच्या हितासाठी विशिष्ट प्रकरणात निवड निकषांमध्ये सूट देण्यात यावी. यापूर्वी आशियाई स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित करण्यात अपयशी ठरल्यानंतर विविध खेळाडू व संघांनी चिंता व्यक्त केली होती.आयओएचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात मंत्रालयाने म्हटले की, आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याची किंवा अव्वल चारमध्ये राहण्याची शक्यता असेल तर खेळाडू किंवा संघांना मंजुरी दिली जाऊ शकते.यानंतर आयओए अडचणीत सापडले व आॅलिम्पिक महासंघाने क्रीडा मंत्रालयाला उत्तर देण्यासाठी कोअर व विधी समितीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयओएचे महासचिव राजीव मेहता म्हणाले, ‘या विषयी उत्तर देण्यासाठी आम्ही कोअर व विधी समितीची शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलविली आहे.रंजित रंजन यांनी प्रश्न केला की, माजी खेळाडूंना तो सन्मान का मिळत नाही ज्याचे ते हकदार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना नोकरी देण्यासाठी किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार काय करीत आहे?त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राठोड म्हणाले,‘भारतीय खेळातील राजकारण संपायला हवे, असे माझे मत आहे. जगदंबिका पाल यांच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना राठोड म्हणाले, मणिपूरमध्ये राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होत असून भविष्यात अन्य राज्यांमध्ये त्याचे केंद्र उघडण्यात येईल.’