नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि भारतीय क्रिकेट मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष असलो तरी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मधील फिक्सिंगमध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही, अशी बाजू मांडणा:या एऩ श्रीनिवासन यांच्यावर विश्वास ठेवणो कठीण आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आह़े
खंडपीठाने म्हटले की, सर्व परिस्थितीचा विचार केला असता श्रीनिवासन यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवणो कठीण आह़े न्यायालयाने श्रीनिवासन यांना म्हटले की, फ्रँन्चायजी घेण्यात तुम्ही घोटाळा केला असे आमचे म्हणणो नाही़ मात्र जेव्हा आपण एखाद्या संघाचे मालक असता तेव्हा तुम्ही त्यात वैयक्तीक लाभ बघता तसेच क्रिकेट प्रशासक या रूपाने आपण विपरीत दिशेन प्रवास करता असेही न्यायालायने म्हटल़े