शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

ह्याला म्हणतात जिद्द...जत्रेत फुगे फोडणाऱ्या नेमबाज सौरभला ऑलिम्पिकचं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 15:39 IST

ISSF World Cup: शेतकऱ्याच्या मुलाची नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली : भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं रविवारी ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्व विक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना त्याने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही जिंकले. 2016 नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अंतिम फेरीत एकदाही पराभूत न होण्याचा सपाटा सौरभने लावला आहे.सौरभने आशियाई स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. अवघ्या 16व्या वर्षी सौरभने भारताला सुवर्ण जिंकून दिले होते. प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सौरभने 240.7 या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याच कामगिरीचे सातत्य राखताना त्याने वर्ल्ड कप स्पर्धेतही इतिहास घडवला. त्याने सर्बियाच्या डॅमिक माकेस ( 239.3 ) आणि चीनच्या वेई पँग ( 215.2 ) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले.जर्मनीत झालेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सौरभने विश्व विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक नावावर केले होते. त्याने 243.7 गुणांची कमाई करताना हे पदक जिंकले होते. चायनीज तैपेईच्या वँग झेहाओ ( 242.5) याच्या नावावर कनिष्ठ गटाचा विश्वविक्रम होता. सौरभच्या या कामगिरीनंतर आशियाई स्पर्धेतही त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या आणि त्यावर तो खरा उतरला होता. त्याने वरिष्ठ वर्ल्ड कपमध्येही आपली दखल घेण्यास भाग पाडले. सौरभला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड ... सौरभच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. पण गावात वर्षातून एक जत्रा नक्की भरायची. त्यासाठी हा पठ्या पैसे साठवायचा. कारण त्याला जत्रेत फुगे फोडायचे प्रचंड वेड होते. तो जत्रेत फुगे फोडायला गेला की बक्षिस नक्कीच जिंकणार, ही त्याच्या घरच्यांनाही खात्री होती. त्यानेही घरच्यांना कधीच निराश केले नाही.  मेरटमधील कलिना गावात सौरभचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत सौरभ शेतीचं काम करत होता. शेतीत तो रमत असला तरी त्याच्यातले गुण प्रशिक्षकांनी हेरले. त्यानंतर तीन वर्षांतच त्याने ही गगन भरारी घेतली. पण सुवर्णपदक पटकावल्यावरही सौरभला आठवण आली ती आपल्या शेतीची. सौरभचे वडिल शेतकरी होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. पण घरच्यांनी सौरभला पूर्णपणे पाठिंबा द्यायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी सौरभला बंदूक घेऊन देण्यासाठी पैसे जमवले आणि त्याला एक लाख 75 हजारांची बंदूक घेऊन दिली.पाहा व्हिडीओ...

टॅग्स :Saurabh Chaudharyसौरभ चौधरीShootingगोळीबार