शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

आयर्लंडचा यूएईवर रोमहर्षक विजय

By admin | Updated: February 26, 2015 01:00 IST

गॅरी विल्सन आणि केविन ओ ब्रायन यांनी योग्य वेळी अर्धशतके झळकावून विश्वचषकातील ब गटाच्या सामन्यात बुधवारी आयर्लंडला यूएईवर दोन गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदवून दिला.

ब्रिस्बेन : गॅरी विल्सन आणि केविन ओ ब्रायन यांनी योग्य वेळी अर्धशतके झळकावून विश्वचषकातील ब गटाच्या सामन्यात बुधवारी आयर्लंडला यूएईवर दोन गड्यांनी रोमहर्षक विजय नोंदवून दिला. यूएईच्या पराभवामुळे शेमान अन्वरचे शतक झाकोळले गेले. फलंदाजीचे आमंत्रण मिळताच यूएईसाठी अन्वरने १०६ धावा ठोकल्या. विश्वचषकात शतक नोंदविणारा देशाचा तो पहिलाच खेळाडू ठरला. संघाची ६ बाद १३१ अशी पडझड झाल्यानंतर अन्वरने अमजद जावेदसोबत (४२) सातव्या गड्यासाठी विक्रमी १०७ धावांची भागीदारी कररून ९ बाद २७८ असा धावसंख्येला आकार दिला.पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडीजला धूळ चारून सनसनाटी पसरविणाऱ्या आयर्लंडच्या आघाडीच्या फळीने चांगली सुरुवात केली; पण मोठी खेळी करण्यात फलंदाज अपयशी ठरले. २६व्या षटकांत संघाच्या ४ बाद ९७ धावा होत्या. विल्सनने (८०) एक टोक सांभाळले, तर केविन ओ ब्रायनने २५ चेंडू खेळून ८ चौकार व २ षटकारांसह ५० धावा फटकावल्या. यामुळे आयर्लंडला ४९.२ षटकांत ८ बाद २७९ धावा करण्यात यश मिळाले. आयर्लंडचा सलग दुसरा विजय असल्याने ४ गुण झाले आहेत. ब गटात हा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. यूएईला सलग दुसऱ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. याआधी हा संघ झिम्बाब्वेकडून पराभूत झाला होता.आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंग (३) झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार विलियम पोर्टरफिल्ड ३७ आणि एड जोएस ३७ यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावा केल्या. विल्सन-बालबिर्नी यांनी पाचव्या तसेच विल्सन- केविन ओ ब्रायन यांनी सहाव्या गड्यासाठी क्रमश: ७२ आणि ७४ धावा ठोकून संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या १० षटकांत संघाला ९५ धावांची गरज होती. त्याच वेळी ओब्रायनने झंझावाती फलंदाजी करून सामना खेचून नेला.त्याआधी यूएईकडून अमजद अली ४५, खुर्रम खान ३६ यांनी चांगली सुरुवात केली. अन्वरने ७९ चेंडूंत १० चौकार व एका षटकारांच्या साह्याने शतक गाठले. १०६ धावा काढून तो झेलबाद झाला.(वृत्तसंस्था)