शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आयपीएल : क्रिकेट क्रांतीची दहा वर्षे

By admin | Updated: April 5, 2017 18:08 IST

भारतीय क्रिकेटच्या गेल्या 85 वर्षांच्या वाटचालीत काही अशा घटना घडल्या आहेत. ज्यांचा जागतिक क्रिकेटवर दूरगामी परिणाम दिसून आला. त्यातील सर्वात क्रांतिकारी घटना म्हणजे आयपीएल

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
भारतात अघोषित धर्माचा दर्जा असलेल्या क्रिकेटच्या गेल्या 85 वर्षांच्या वाटचालीत काही अशा घटना घडल्या आहेत. ज्यांचा जागतिक क्रिकेटवर दूरगामी परिणाम दिसून आला. त्यातील सर्वात क्रांतिकारी घटना म्हणजे आयपीएल. देशविदेशातील आघाडीच्या क्रिकेटपटूंची उपस्थिती, षटकार-चौकारांची बरसात, चियरलिडर्सचा डान्स यामुळे कमालीची लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या आयपीएलच्या दहाव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. "ये दस साल आप के नाम" या आयपीएलच्या गेल्या दहा वर्षांतील यशाचे श्रेय चाहत्यांना समर्पित करणा-या शीर्षकगीताने यंदाच्या मोसमाची प्रसिद्धी केली जात आहे आणि चाहतेही स्पर्धेच्या नव्या मोसमाचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल़्या नऊ वर्षात आयपीएलने एकापेक्षा एक महान खेळाडूंचा संस्मरणीय खेळ, नवनवे विक्रम, अनेक वादविवाद आणि छप्पर फाड के यश असे बरेच काही पाहिलेय. एका अर्थाने आयपीएल भारतीय क्रिकेट आणि एकंदरीत क्रीडा क्षेत्रात क्रांतिकारक ठरली आहे.गेल्या नऊ वर्षात आयपीएलने क्रिकेटमध्ये अनेक चांगले आणि वाईट परिणाम घडवून आणले. आयपीएलने बीसीसीआयच्या दारी पैशांची गंगा आणली. तिसऱ्या, चौथ्या श्रेणीतील क्रिकेटपटूही काही कोटी रुपयांमध्ये खेळू लागले.  आज बीसीसीआयच्या उत्पन्नातील सर्वाधिक हिस्सा आयपीएल मधूनच येतोय.  आर्थिक कमाईच्या बाबतीत जशी आयपीएल १०० टक्के यशस्वी ठरली, तसाच तिचा खेळावरही परिणाम दिसून आला. क्रिकेटपटूंकडून कसोटी क्रिकेट ऐवजी मर्यादित षटकांच्या क्रिकेटला प्राधान्य देण्यात येऊ लागले आहेत. त्याचा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटच्या दर्जावरही परिणाम दिसून येतोय. ( हे आहेत IPLमधील गाजलेले 12 वाद-विवाद)
मग आयपीएलच्या आर्थिक यशाची भूरळ जगातील इतर क्रिकेट संघटनांना पडली नसती तर नवल.  आयपीएलच्या पावलावर पाऊल ठेवत इतर देशातही ट्वेंटी-२० क्रिकेट लीग सुरू झाल्या. त्यात ऑस्ट्रेलियातील बिग बॅश, बांगलादेश प्रिमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग बऱ्यापैकी लोकप्रिय झाल्या. पण आयपीएलसारखी लोकप्रियता आणि आर्थिक यश मात्र मिळाले नाही. 
बरं आयपीएलचा प्रभाव केवळ क्रिकेटवरच पडला असेही नाही. भारतातील इतर क्रीडा संघटनाही आयपीएलमुळे प्रभावित झाल्या. एरवी क्रिकेट आणि  बीसीसीआयच्या नावाने नाक मुरडणा-या या क्रीडा संघटनांनी बीसीसीआयच्या पावलावर पाऊल ठेवत आपापल्या खेळात लीग सुरू केल्या. हॉकी इंडिया लीग, फुटबॉलमधील आयएसएल, प्रोफेशनल बॅडमिंटन लीग, टेनिसमधील आयपीटीएल, कुस्ती लिग,  प्रो कबड्डी अशा विविध खेळातल्या डझनभर लीग आता आयोजित होऊ लागल्या आहेत. या लीगमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचा विस्तार होऊ लागलाय. नवनव्या प्रतिभावंत खेळाडूंची ओळख होऊ लागली आहे. त्या अर्थाने भारतीय क्रीडा क्षेत्रात आलेल्या या व्यावसायिक लीग क्रांतीचे काही श्रेय आयपीएललाही द्यावेच लागेल.  
( IPL 10 - कोण असेल सिकंदर?)
 
बाकी आयपीएलमधील पैशाच्या महापुराने काही अपप्रवृत्तींनाही खेळात मोकळे रान मिळवून दिले.  गेल्या नऊ हंगामात आयपीएलमध्ये वादविवादही खूप झाले. ललित मोदींचा घोटाळा, स्पॉट फिक्सिंग कांड यांनी तर आयपीएलला पुरते बदनाम केले. फिक्सिंगसारख्या गंभीर प्रकारांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाला भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयमध्ये शुद्धिकरण मोहीम हाती घ्यावी लागली. पण  अनेक गुणदोषांसह आयपीएलने भारतीय क्रीडा विश्वाला ढवळून काढले आहे.क्रिकेट भारतात आधीपासूनच लोकप्रिय होते. पण त्याला चिक्कार पैसा आणि ग्लॅमरचा तडका देण्याचे काम आयपीएलने केले. त्याचे भलेबुरे परिणाम झाले असतीलही. पण आज आयपीएल भारतीय क्रिकेटचा अविभाज्य भाग बनले आहे.  हे नाकारता येणार नाही.