शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2017 लिलावाला सुरुवात, बेन स्टोक्स पुण्याच्या ताफ्यात

By admin | Updated: February 20, 2017 12:26 IST

इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 20 - इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी भारतीय युवा खेळाडू व अफगाणच्या खेळाडूंवर सर्वांची नजर आहे. लिलावामध्ये ३५० पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश असून, जास्तीत जास्त ७६ खेळाडूंना करारबद्ध करता येणार आहे. खेळाडूंची बोली लावण्यास सुरुवात झाली असून  अनेक मोठ्या खेळाडूंना घेण्यात फ्रँचायझींनी अनुकूलता दाखवलेली नाही. युवा खेळाडू सौरव तिवारी आणि इरफान पठाणला कोणत्याही संघाने घेतलेलं नाही.
(युवा भारतीय व अफगाणच्या खेळाडूंवर नजर)
 
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सर्वांची पसंती मिळाली असून 14.50 कोटींची बोली लागली. 2 कोटी बेस प्राईस असलेल्या स्टोक्ससाठी मुंबई इंडियन्सने बोली लावली, पण अखेर पुणे सुपरजायंट्सला स्टोक्सची खरेदी करण्यात यश मिळालं.
 
कोणत्या खेळाडूवर कितीची बोली - 
 - इंग्लंडचा कप्तान इयॉन मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2 कोटींमध्ये खरेदी केले.
- इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 14.50 कोटींची बोली, स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स ताफ्यात.
- इरफान पठाणला कोणीही खरेदी केलं नाही.
- निकोलस पुरनची मुंबई इंडियन्सकडून 30 लाख रुपयांत खरेदी
- इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला खरेदीदार मिळाला नाही 
- श्रीलंकेचा अॅजलो मॅथ्यूज आणि न्यूझीलंडचा कोरी अॅडरसन दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ताफ्यात
- कोरी अँडरसनला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 1 कोटीत खरेदी केलं.
- अँजेलो मॅथ्यूजला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2 कोटीत खरेदीची
- कॅगिसो रबाडाची दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 5 कोटींमध्ये खरेदी
 - टी. मिल्ससाठी विक्रमी बोली, 12 कोटींमध्ये आरसीबीकडून खरेदी 
- मिचेल जॉन्सन मुंबई इंडियन्सकडून खेळणार, 2 कोटींमध्ये खरेदी
- प्रज्ञान ओझासाठी एकाही संघाने बोली लावली नाही 
- इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 12 कोटी रुपयांचा भाव
- न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टची कोलकाता नाईट रायडर्सकडून 5 कोटी रुपयांत खरेदी.
- ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून साडे चार कोटींची बोली
- ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनची मुंबई इंडियन्सकडून दोन कोटीत खरेदी
- वेस्ट इंडियन यष्टिरक्षक निकोलस पूरनची मुंबई इंडियन्सकडून फक्त 30 लाखात खरेदी 
- तन्मय अगरवालला 10 लाखांच्या मूळ किमतीतच सनरायझर्स हैदराबादने केलं खरेदी
- राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून 2 कोटींची बोली.
- कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णाप्पा गौतमसाठी मुंबई इंडियन्सची दोन कोटींची बोली.
 - मोहम्मद नबी ठरणार आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अफगाणी. सनरायझर्स हैदराबादकडून 30 लाखांत खरेदी.
- अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खान अहमदला सनरायझर्स हैदराबादकडूकडून 50 लाखांवरून  4 कोटींची बोली.