शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

IPL 10 - मुंबईने केकेआरला विजयासाठी दिले 174 धावांचे लक्ष्य

By admin | Updated: May 13, 2017 22:14 IST

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. मुंबईने निर्धारीत 20 षटकात पाच बाद 173 धावा केल्या.

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. 13 -  अंबाती रायडू (63) आणि सलामीवीर सौरभ तिवारी (52) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणा-या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य दिले आहे. मुंबईने निर्धारीत 20 षटकात पाच बाद 173 धावा केल्या. कोलकाताकडून बाऊल्टने सर्वाधिक 2 तर, कुलदीप यादव आणि राजपूतने प्रत्येकी एक विकेट घेतला. 
 
पावसामुळे सामना काही मिनिटे उशिराने सुरु झाला. कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयपीएल १० च्या गुणतक्त्यात सध्या मुंबई इंडियन्स १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  क्वालिफायर १ मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मुंबई आणि कोलकाता या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.  केकेआर १६ गुणांसह दुस-या स्थानावर आहे.  रोहित शर्मा आणि संघाने पुणे वगळता इतर सर्वच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले आहे. केकेआरला देखील या आधीच्या सामन्यात पराभूत केले.
 
 मुंबईला या आधीच्या दोन सामन्यात सनरायजर्स आणि पंजाबकडून पराभव पत्करावा लागला आहे. तर पंजाबने केकेआरला देखील गेल्या सामन्यात पराभव पत्करायला भाग पाडले होते.  गुणतालिकेत आपले वर्चस्व राखण्यासाठी गंभीर आणि शर्मा दोन्ही या सामन्यात आपले कसब पणाला लावतील. दोन्ही संघाचा हा साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना आहे.
 
मुंबईला उद्याच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहित शर्माला खेळपट्टीवर स्थिरावणे गरजेचे आहे. लेंडल सिमन्स, केरॉन पोलार्ड आणि पार्थिव पटेल हे धावा करत आहेत. मात्र त्यासोबतच युवा नितीश राणा याला देखील आपले कसब दाखवावे लागेल. मागच्या चार ते पाच सामन्यात तो संघासाठी मोठी खेळी करु शकलेला नाही.  
 
तसेच हार्दिक पांड्या फलंदाज म्हणून कसब दाखवत आहे. मात्रगोलंदाजीतही त्याला आपली भेदकता सिद्ध करावी लागेल. मुंबईची गोलंदाजी ही केकेआरपेक्षा मजबूत आहे. कर्ण शर्मा, हरभजन सिंह,कृणाल पांड्या यांच्यासारखे फिरकीपटू आणि जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिशेल मॅक्लेघन हे जलदगती गोलंदाज आहेत. मुंबईला फलंदाजीत आणखी मजबूती हवी असल्यास कर्ण शर्मा ऐवजी कृणाल पांड्याला संधी द्यावी लागेल.
 
 कृणालने आपले अष्टपैलुत्व नेहमीच सिद्ध केले आहे.कोलकात्याला आपल्या आघाडीच्या फलंदाजांवर विसंबुन राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. मुंबईच्या गोलंदाजांसमोर ख्रिस लीन, सुनिल नरेन या पार्टटाईम ओपनर सोबतच गंभीर, उथप्पाचे देखील आव्हान असेल. मनिष पांडे याने देखील स्पर्धेत लक्षवेधी खेळी केली आहे. मुंबईच्या फलंदाजांना कुल्टरनाईल, डी ग्रॅण्डहोम आणि उमेश यादव यांच्यापासून सावध रहावे लागेल.