ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ - ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या फूटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात आले आहे. खुद्द ब्राझीलचे राष्ट्रपती दिल्मा रौसेफ यांनी मोदींना हे निमंत्रण पाठवले आहे. तसेच ब्राझीलने BRICS मधील सर्व राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठवल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र मोदी हा अंतिम सामना पाहण्यास जाणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंतप्रधान कार्यालयाशी संबधित सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला असून ब्राझीलच्या राष्ट्पतींनी हे निमंत्रण पाठवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र मोदींतर्फे या निमंत्रणाला अद्याप काहीही उत्तर पाठवण्यात आलेले नाही.